भरधाव चार चाकी वाहनावरून वाहनचालकाचा ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट दूर वर चाके घासत जावून झाडावर आदळली. वाहन पलटी झाले.
1 killed in road accident on Gaurakshan Road; 2 seriously injured
अकोला : गौरक्षण रोडवरील चार बंगल्या जवळ वाहन चालकाचा भरधाव वाहना वरून ताबा सुटल्याने वाहन पलटी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत जागीच एकाचा जागीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली.
मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास गौरक्षण रोडवर तुकाराम चौकाकडे जात असलेल्या MH 30 BF 6430 या भरधाव चार चाकी वाहनावरून वाहनचालकाचा ताबा सुटल्याने सुमारे शंभर फूट दूर वर चाके घासत जावून झाडावर आदळली. वाहन पलटी झाले . हा अपघात चार बंगल्या जवळ घडला. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाले.
या घटनेची माहिती उपस्थित नागरिकानी पोलिसांना दिली.अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले.अपघात ग्रस्त हे २५ ते ३० वयोगटातील असल्याचा अंदाज प्रत्यक्षदर्शीनी लावला. अपघातग्रस्तांची अद्याप ओळख पटली नसून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा