Ramvilas Paswan: दलितांचे कैवारी रामविलास पासवान यांचे निधन

पापा ... तूम्ही या जगात राहिले नाहीत, परंतु मला माहित आहे की तूम्ही जिथे आहात तिथे तुम्ही नेहमीच माझ्याबरोबर आहात." 

Dalit hero RamVilas Paswan passes away


भारतीय अलंकार

नवी दिल्ली: केंद्रीय अन्न व पुरवठा मंत्री  रामविलास पासवान यांचे निधन आज गुरुवारी दिल्ली येथे झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांचे पुत्र आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी गुरुवारी संध्याकाळी त्यांच्या निधनाबद्दल ट्विट करून सांगितले. 


यात चिराग यांनी त्यांच्या बालपणाचा एक फोटो ट्वीट केला. ज्यात चिराग हे रामविलास पासवान यांच्या मांडीवर बसलेले आहेत. आणि त्यांनी लिहिले आहे- "पापा ... तूम्ही या जगात राहिले नाहीत, परंतु मला माहित आहे की तूम्ही जिथे आहात तुम्ही सदैव माझ्यासोबत आहात." असे भावूक ट्विट केले. 


रामविलास पासवान हे गेल्या काही आठवड्यांपासून आजारी होते. त्यांना दिल्लीतील साकेत येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रामविलास पासवान पाच दशकांहून अधिक काळ राजकारणात सक्रिय होते आणि त्यांना देशातील सर्वात मोठे दलित नेते म्हणून ओळखले जाते.


रामविलास पासवान यांच्या निधनाच्या बातमीमुळे राजकीय क्षेत्रात शोककळा पसरली.  रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल सर्वच पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, देशाने एक दूरदर्शी नेता गमावला आहे.  राष्ट्रपती म्हणाले- ते संसदेत सर्वात सक्रिय आणि दीर्घ-सेवा सदस्य होते. ते दडपलेल्या आवाजांचा हुंकार होते.




रामविलास पासवान यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी दुःख व्यक्त केले.  रामविलास यांचे निघून जाणे, हे वैयक्तिक नुकसान आहे. मी माझा मित्र आणि मजबूत सहकारी गमावला,असे मोदी यांनी ट्विटर हॅन्डलवर ट्विट केलं.



पासवान यांनी निभावले कॅबिनेट मंत्रीपद

 1989- कामगार कल्याण मंत्री

 1996 - रेल्वेमंत्री

 1996 - संसदीय कार्यमंत्री

 1999- संप्रेषण आणि माहिती तंत्रज्ञान     मंत्री

 2001 - कोळसा आणि खाणी मंत्री

 2004- रसायन आणि खते मंत्री, पोलाद

 2014 आणि 2019 - ग्राहक व्यवहार मंत्रालय आणि पीडीएस


टिप्पण्या