politicalnews:सरकारी बगिचा:आमदार बाजोरिया यांना पडला ५० लाखाचा विसर; संजय धोत्रे यांनी आज विकासकामांची केली पाहणी

        राजकारण अकोल्याचे

शिवसेनेने केलेले नामकरण राहिले नामफलका पुरतेच मर्यादित; शहर बगिचा विकास कामाची संजय धोत्रे यांनी केली आज पाहणी




भारतीय अलंकार

अकोला: Lockdown काळात शिवसेनेने शहर सरकारी बगीच्याला स्व.बाळासाहेब ठाकरे उद्यान नाव दिले होते. नामफलक लावण्याचा कार्यक्रम झटपट आटपून पण घेतला होता.बगिचा विकास कामासाठी ५० लाख देण्याची ग्वाही सुध्दा आमदार गोपिकीसन बाजोरिया यांनी दिली होती.मात्र,एवढे दिवस उलटूनही कुठलाच विकास निधी बाजोरिया यांनी उपलब्ध करून दिलेला नाही. तर आज नामदार संजय धोत्रे यांनी बगिचा विकास कामाची पाहणी केली. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा यांनी बगिचा विकास करिता आणखी २० लाख मंजूर केले.तसेच संजय धोत्रे यांनी, गरज पडल्यास निधी कमी पडू देणार नाही,अशी ग्वाही दिली. त्यामुळे आता शिवसेनेचे नामकरण नामफलक पुरतेच मार्यदित राहते की काय,अशी चर्चा शहरात रंगत आहे.


  


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या शहर बगीचा उद्यान येथे विविध विकास कामांची सुरवात करण्यात आलेली आहे. आमदार  गोवर्धन शर्मा यांच्या  प्रयत्नातून मिळालेल्या विशेष निधी अंतर्गत ही विकास कामे करण्यात आलेली आहे. आता आणखी २० लाख या बगिचा विकासासाठी आमदार शर्मा उपलब्ध करून देणार आहेत.


आतापर्यंत या विकास कामामध्ये प्रामुख्याने दीड एकर मध्ये हिरवळ लागवड करण्यात आली. वॉकिंग ट्रॅक, विविध देखावे, शोभिवंत झाडे व फुलझाडे याची रोपवाटिका तयार करण्यात आली. एकूणच संपूर्ण बगीच्याला सुशोभीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय चिल्ड्रेन पार्क, बॉटनिकल गार्डन व कॅक्टस गार्डन करणे प्रस्तावित आहे.



या विकास कामाची पाहणी केंद्रीय मंत्री   संजय धोत्रे यांनी आज केली.आमदार  गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार  हरीश पिंपळे, महापौर अर्चना म्हैसने, माजी महापौर विजय अग्रवाल, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पी.के नागरे, पुष्पशाखा व प्रांगण विद्या  विभागप्रमुख एन. एस. गुप्ता, डॉ. मनीषा देशमुख,  नवीन राठोड, डॉ. प्रविणा सातपुते, अनुज राऊत, परमेश्वर सवडे इत्यादी मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते.


 

पाहणी दरम्यान संजय धोत्रे यांनी उद्यान  विकास कामाकरिता हवी ती मदत करण्याची ग्वाही दिली.आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर व इतर मान्यवर यांनी शहर बगीचा येथे सुरू असलेल्या विकास कामाबद्दल समाधान व्यक्त केले. 


शिवसेनेने दिले होते सरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव!






शहरातील सरकारी बगिचाला शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले. लॉकडाउन काळात मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवसेनेने नामफलक लावण्याचा कार्यक्रम झटपट आटपून घेतला होता.कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात हा नामफलक लावण्यात आला होता.



याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि परभणी-हिंगोलीचे विधानपरिषद आमदार विप्लव बाजोरिया उपस्थित होते. नामकरणाला कृषीमंत्री दादा भूसे यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांचा पाठींबा असल्याचा दावा आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला होता. तसेच उद्यान विकासासाठी आमदार बाजोरिया यांनी त्यांच्या निधीतून ५० लाख रुपये  देण्याची ग्वाही सुद्धा यावेळी दिली होती. मात्र, एवढे दिवस उलटूनही अद्याप देखील आमदार बाजोरिया यांनी कोणताच निधी उपलब्ध करून दिलेला नाही.त्यामुळे आता बगिचाचे नामकरण फक्त नामफलक पुरतेच मर्यादित राहते की काय,अशी अकोला राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.


 हे सुध्दा वाचा: शिवसेनेने दिले सरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव!









टिप्पण्या