- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शिवसेनेने दिले सरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव!
अकोला: शहरातील सरकारी बगिचाला शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले.आज शनिवारी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवसेनेने नामफलक लावण्याचा कार्यक्रम झटपट आटपून घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सरकारी बगिचा नावाने ओळखला जाणारा हा बगिचा शहरातील जुन्या बगिच्यापैकी एक आहे. हा बगिचा सध्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मालकीचा आहे. या बगीच्याला आज शिवसेनेने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फलक लावला. कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि शिवसेनेचे विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या नेतृत्वात आज हा नामफलक लावण्यात आला.
याप्रसंगी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह बाळापूरचे आमदार नितीन देशमुख आणि परभणी-हिंगोलीचे विधानपरिषद आमदार विप्लव बाजोरिया उपस्थित होते.
नामकरणाला कृषीमंत्री दादा भूसे यांच्यासह विद्यापीठाच्या कार्यकारी परिषद सदस्यांचा पाठींबा असल्याचा दावा आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला. नामकरणाच्या या मुद्द्यावरून आता शहरात राजकारण पेटण्याची संकेत प्राप्त होत आहे.
अकोला शहराचे शिल्पकार विनयकुमार पराशर, डॉ.पंजाबराव देशमुख,नानासाहेब वैराळे, संत गाडगेबाबा किंवा संत गजानन महाराज यांचे नाव उद्यानाला देण्यात यावे,अशी अकोलेकरांची इच्छा होती.आता मात्र,lockdown मध्ये शिवसेनेने नामकारण कार्यक्रम झटपट आटपून घेतल्याने या मुद्द्यावरून अकोल्याचे राजकारण कसे वळण घेते, हे येत्या काळात दिसेल एवढे मात्र निश्चित.
उद्यानासाठी 50 लाख!
उद्यान विकासासाठी आमदार बाजोरिया यांनी त्यांच्या निधीतून 50 लाख रुपये देण्याची ग्वाही सुद्धा यावेळी दिली.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा