- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
साधिकांनी भक्ती आणि श्रद्धा सोबत covid-19 काळात सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले.
अकोला: हिंदू सनातन धर्म प्राचीन असून, यात अनेक संप्रदाय पंथ यांचा समावेश आहे. मानवता, करूणा, माया, भक्ती, संस्कार ,श्रद्धा तसेच मनशांतीसाठी आराधना मार्ग सांगितला आहे. प्रजापिता ब्राह्मकुमारी परिवाराने सुद्धा शिवभक्तीच्या माध्यमातून मार्ग दाखवला आहे. साधिकांनी भक्ती आणि श्रद्धा सोबत covid-19 काळात सुद्धा महत्त्वपूर्ण योगदान दिले. या साधिकांचा सन्मान भाजपा महिला आघाडीच्या माध्यमातून होत असल्याचा आनंद होत असल्याचे, प्रतिपादन कमल सखी व भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सुहासिनी धोत्रे यांनी केले.
भाजपा महिला आघाडी भाजपा महानगर तर्फे ब्रह्मकुमारी साधिकांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गंगादेवी शर्मा होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मंजुषा सावरकर, महापौर अर्चना मसने, चंदा शर्मा, सीमा मांगटे पाटील, सुनीता अग्रवाल उपस्थित होत्या. यावेळी गीतांजली शेगोकार, साधना येवले, सारिका जयस्वाल, शारदा खेडकर, शारदा ढोरे, साधना ठाकरे, निकिता देशमुख, वर्षा गावंडे, अर्चना गुंडेवार, नीलिमा वोरा, अनुराधा नावकार, मनिषा भंसाली, जयश्री दुबे, चंदा ठाकूर, बेबी गीते, रश्मी अवचार आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.
भारतीय जनता पक्ष महिला आघाडीने आतापर्यंत समाजातील सर्वस्तरातील मातृ शक्तींचा सन्मान करून, त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचा संकल्प नवरात्रीच्या पर्वावर घेतला आहे.
सुहासिनी धोत्रे यांनी भाजपा महिला आघाडीच्या कार्याची प्रशंसा करून, ब्रह्मकुमारी साधकांच्या पासून प्रेरणा घेऊन कार्य करण्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन चंदा शर्मा तर आभार प्रदर्शन निकिता देशमुख यांनी केले. प्रास्ताविक मनिषा भंसाली यांनी केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा