Mumbai today: तिन्ही मार्गावरची लोकल सेवा पूर्ववत; वीजपुरवठा अडीच तासांपेक्षा अधिक काळाने होताहे सुरळीत

तिन्ही मार्गांवरची लोकल सेवा पूर्ववत झाली. दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत  यांच्याशी चर्चा केली.


local service on all three routes;  The power supply lasts for more than two and a half hours (pho to: ट्विटर)





मुंबई: मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल रेल्वे वीज पुरवठा खंडित झाल्याने आज सकाळी १० च्या सुमारास बंद पडली होती. अडीच तीन तासापेक्षा अधिक काळ मुंबई ठप्प पडली होती.मात्र,आता पूर्वपदावर आली आहे.

 


दरम्यान, वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी जेणे करुन अडचण होणार नाही, याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे  यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.



यासर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे व तात्काळ मदत करावी, असेही त्यांनी मुख्य सचिव आणि मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितले. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून, तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा, असेही  ठाकरे यांनी निर्देश दिले.



दरम्यान, महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने  ठाणे, कल्याण, पालघर  व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली.याचा cascading effect मुळे मुंबई व मुंबई उपनगरातील वीज देखील खंडीत झाली आहे. महापारेषण कंपनीचे अधिकारी कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत एका तासात वीज पूर्ववत सुरू होईल.वीज पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ज्या कारणामुळे तांत्रिक बिघाड झाला त्याची चौकशी करण्यात येईल,असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.


महापारेषणच्या 400 KV कळवा पडघा GIS केंद्रात सर्किट 1 देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट 2 वर होता. मात्र, सर्किट 2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई व ठाणे मधील बहुतांश भाग प्रभावित आहे, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्ट केले.


मुंबई, मुंबई उपनगरे, कल्याण, ठाणे, पालघर आणि नवी मुंबईतील सर्व आवश्यक सेवांचा वीजपुरवठा पूर्ववत झाला आहे. अनावश्यक सेवा देखील लवकरच पुनर्संचयित केल्या जातील,असे राऊत यांनी सांगितले.




मुंबईतील वीजपुरवठा जवळपास अडीच तासांपेक्षा अधिक काळाने सुरु झाला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई परिसरातील वीजपुरवठा हळूहळू सुरु होत आहे. वीजपुरवठा सुरळीत झाल्याने ठप्प झालेली लोकल रेल्वेची वाहतूक आणि जनजीवन पूर्वपदावर येत आहे.


हे सुध्दा वाचा:मुंबई पडली ठप्प;विद्युत पुरवठा बंद


दरम्यान, समाज माध्यमातून मीटर चालू बत्ती गुल,अशा प्रकारचे मिम्स पसरल्या गेले. असे छायाचित टाकून विनोद करण्यात आले.


फेसबुक,ट्विटर, व्हाट्सअप्प वर असे अशा प्रकारचे बरेच फोटो,मिम्स व्हायरल झाले.










टिप्पण्या