mumbai Railway:मुंबई पडली ठप्प; विद्युत पुरवठा बंद

मुंबई पडली ठप्प; विद्युत पुरवठा बंद


मुंबई: मुंबईत विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सतत धावणारी मुंबई आज सकाळी 10.15 मिनिटांपासून थांबलेली आहे.



तांत्रिक बिघाडमुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने आज सकाळी सव्वा दहा वाजता पासून राज्याची राजधानी मुंबईची गती मंदावली आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने याचा मोठा परिणाम मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनवर दिसून आला आहे. लांब पल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला आहे. अनेक लोकल रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत.


नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. म्हणून या तिन्ही मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने मध्य, सेंट्रल आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली..त्यामुळे आज  मुंबईकडे येणाऱ्या चाकरमान्यांना लोकल मध्येच अडकून राहावे लागले.


सोमवार हा आठवड्याचा पहिलाच दिवस असल्या मुळे अचानक वीज पुरवठा खंडित झाला असल्यामुळे लोकांच्या महत्वाच्या कामात खोळंबा निर्माण झाला. 



सर्व रेल्वे स्थानकांवर लोकल एका मागोमाग एक उभ्या आहेत, प्रवाशी स्थानकात थांबून आहेत. त्याशिवाय इंटरनेट सेवा बंद झाल्याने मुंबई-ठाण्यातील कामे ठप्प झाली आहेत. रुग्णालयांना  सुध्दा याचा फटका बसला. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, इतर तांत्रिक उपकरण बंद पडण्याची शक्यता असून जनरेटरच्या माध्यमातून रुग्णालयातील व्हेंटिलेटर सुरू करण्यात आली.


दादर, लोअर परळ, वरळी, भांडुप, दादर आणि बोरिवली,घाटकोपर परिसरात वीज पुरवठा बंद झाला आहे. अनेक ठिकाणी हॉटेल, कार्यालयांमध्ये वीज नसल्यामुळे अडचणी येत आहेत.



रेल्वे पोलिसांमार्फत प्रवाश्यांना शांतता बागळण्याच्या सूचना देण्यात येत आहे. त्याच प्रमाणे या परिस्थितीत सहकार्य करण्याची विनंती सुद्धा करण्यात येत आहे.तर लोकल सेवा पूर्वरत सुरू करण्यासाठी रेल्वे विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हंटले आहे.



विद्युत पुरवठा खंडित झाल्याने याचा मोठा परिणाम रुग्णालयांवर सुद्धा पडला आहे अनेक रुग्णालयात होणारी आज शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे..त्याच प्रमाणे अत्यावश्यक सेवेवरही याचा परिणाम झाला आहे..औषध दुकानात मेणबत्ती आणी मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने काम सुरू आहे...नागरिकांच्या घरातील विद्युत उपकरणे बंद पडली आहे..काहीसा परिणाम याचा ऑनलाइन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्त्यांनवरही पडला आहे.


टिप्पण्या