Lightning strikes: दोनद येथे गुरख्याच्या ठिय्यावर पडली वीज; ४ पैकी २ गंभीर जखमी,उपचारार्थ अकोल्यात दाखल

अचानकपणे विजांचा कडकडाट होऊन पाऊस सुरु झाला. यावेळी हा परीवार आपल्या ठीय्यावर लोखंडी बाजीवर बसलेल्या अवस्थेत  असतांना अचानक विज पडली. 



अकोला: दोनद खुर्द (बार्शीटाकळी)  येथील शिवारात शेळी मेंढी चारणा-या गुराख्यांच्या ठिय्यावर विज पडुन आईसह तीन मुले जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली.


घटनाक्रम

दोनद खु.जवळ एका शेतात संध्या सदाशिव दडस वय अं.(45)वर्ष , मुलगी सिमा सदाशिव दडस वय अं.(18) वर्ष, मुलगी सपना सदाशिव दडस वय अं.(19) वर्ष, मुलगा प्रविण सदाशिव दडस वय अं.(21) वर्षे, सर्व रा. मलकापुर (माना) ता. मुर्तीजापुर ह.मु.दोनद.


दोनद गावाजवळील पिंजर अकोला रोडला लागुन असलेल्या गजानन पाटील यांच्या शेतात सदाशिव दडस हे आपल्या परीवारासह शेळी मेंढी घेऊन राहतात.  आज दुपारनंतर अचानकपणे विजांचा कडकडाट होऊन पाऊस सुरु झाला. यावेळी हा परीवार आपल्या ठीय्यावर लोखंडी बाजीवर बसलेल्या अवस्थेत  असतांना अचानक विज पडली. यामध्ये आई सह एक मुलगा आणि दोन मुली जखमी झाल्या. गावकऱ्यांनी एका ॲटोने  या परीवाराला पिंजर येथे डाॅ.शरद लहाने यांच्या दवाखान्यात आणले. 


या घटनेची माहिती तात्काळ अशोक लोणाग्रे (पिंजर) यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. 




दीपक सदाफळे यांनी लगेच सुत्र हालवुन 108 रुग्णवाहिका तात्काळ बुक केली.  वैद्यकीय अधिकारी डॉ.आगलावे यांनी  प्राथमिक उपचार करून अकोला येथे जिल्हा रुग्णालयात गंभीर जखमींना पाठविले. आईची आणि मुलाची प्रकृती सुखरूप आहे. दोन मुलींना पुढील उपचारासाठी अकोल्यात आणले. 


या घटनेनंतर आमदार  हरीष पिंपळे,  तहसीलदार गजानन हामद संपर्कात होते. डाॅ.शरद लहाने आणि अशोक लोणाग्रे  यांनी यावेळी उत्तम सहकार्य केले, अशी माहिती पथक प्रमुख जिवरक्षक  दीपक सदाफळे यांनी दिली. 


हे सुध्दा वाचा:अकोल्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाडात जोरदार पाऊस

टिप्पण्या