Heavy rain:अकोल्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाडात जोरदार पाऊस

आज रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अकोला शहरात विजेच्या कडकडाडात मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. आकाश ढगांनी काळवांडून गेले होते.

Heavy rain with thunder and lightning in Akola



भारतीय अलंकार
अकोला: राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.आज रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अकोला शहरात विजेच्या कडकडाडात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. आकाश पूर्ण ढगांनी काळवांडून गेले होते. आभाळ ढगांनी आच्छादून गेल्याने काही वेळ अंधार झाला होता.




बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात लक्षणीय बदल झाले असून, रविवार आणि सोमवारी विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला आरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सोमवार मुंबईसह संपूर्ण कोकण परिसराला आरेंज अलर्ट देण्यात आला.




आज ११ आक्टोबर रोजी विदर्भ, मध्य महाराष्ट्र,मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल,असा हवामान खात्याने अंदाज वर्तविला होता.आज अकोल्यात जोरदार पाऊस पडला.


पुढील चार दिवस हा पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यानुसार १२ आक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाड्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. १३ आक्टोबर रोजी विदर्भ, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. १४ आक्टोबर रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, गोव्यात मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या काळात ताशी ७० किमी वेगाने वारे वाहणार आहेत. यामुळे समुद्र खवळलेले राहतील. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन मुंबई हवामान खात्याने केले आहे.


विदर्भातही मुसळधार पाऊस


विदर्भातील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज हवामान खात्याच्या नागपूर विभागाने वर्तविला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज नागपूर हवामान खात्याने वर्तवला आहे. 


हवामान विभाग, नागपूर यांच्या संदेशानुसार रविवार ११ ऑक्टोंबर रोजी  जिल्ह्यामध्ये हल्का ते मध्यम अधिक स्वरुपाचे पर्जन्यमान तसेच एक दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता वर्तविलेली होती. 


अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी मेघ गर्जनासह पाऊस



जिल्ह्यातील मोठे, मध्यम व इतर लघु प्रकल्पामध्ये जवळपास १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला असून, इतरही प्रकल्पामधील जलसाठ्यामध्ये वाढ होत आहे. प्रकल्पाक्षेत्रामध्ये पर्जन्यमान होवून प्रकल्पामधील जलसाठ्यात वाढ झाल्यास विसर्ग वाढविणे किवा कमी करण्याबाबत निर्णया घेण्यात येईल.  याबाबत नदीपात्रा शेजारील गावातील नागरिकांना आवश्यक ती दक्षता घेण्याचे अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. संबधित अधिकारी, कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, आरोग्य विभागाचे कर्मचारी यांना आपले मुख्यालयी उपस्थित रहावे. तसेच  नागरिकांनी नदी नाल्यांना पूर असताना पुर ओलाडण्याचा प्रयत्न करु नये. याकरिता योग्य ती दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.


विदर्भात पाऊस:हवामान अंदाज

नागपूर: हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्धा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना भंडारा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गोंदिया : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना चंद्रपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अमरावती : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता  अकोला : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता यवतमाळ : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना बुलढाणा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता  वाशिम : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.


काटेपूर्णा प्रकल्प 

आज  ११ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता काटेपूर्णा  प्रकल्पातुन नदीपात्रात होत असलेला विसर्ग १०२.३३ घ.मी./से. वरून वाढवून २५५.८३ घ.मी./से.एवढा करण्यात आला आहे. प्रकल्पाचे १० वक्रद्वारे प्रत्येकी 30 cm उंचीने  उघडुन नदीपात्रात   विसर्ग सोडण्यात येत आहे.पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे अथवा कमी करणे बाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. तरी नदी काठच्या गावांतील   नागरिकांनी  सावध राहावे, असे काटेपूर्णा प्रकल्प पूर नियंत्रण कक्ष तर्फे कळविण्यात आले आहे. 



शेतकऱ्यांची चिंता वाढली
आज बरसलेल्या या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.या पावसाचा मोठा फटका सोयाबीन आणि कपाशी या दोन्ही पिकांना बसण्याची चिन्ह आहेत.



टिप्पण्या