- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील विश्रामगृहात हा छोटेखानी समारंभ झाला होता.
नीलिमा शिंगणे-जगड
अकोला: माजी आमदार डॉ जगन्नाथ ढोणे यांचे सोमवारच्या रात्री हृदय विकाराने निधन झाले. त्यांचेवर आज मंगळवारी दुपारी १२.३० वाजता पातूर येथील डॉ. वंदनाताई जगन्नाथराराव ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय परिसरातील डॉ वंदनाताई ढोणे स्मृती स्थळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
जगन्नाथ ढोणे यांनी कोरोनावर मात करून, दैनंदिन जीवन सुरळीत केले होते. हरदिल अजीज असणारे जगन्नाथ ढोणे यांच्यावर मात्र आज काळाने घाला घातला. त्याच्यामागे पत्नी,मुलगा आहे.
भाजपात प्रवेश
ढोणे यांचा राजकीय प्रवास रंजक होता. शिवसेना, भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा असा प्रवास त्यांनी केला. छगन भुजबळ यांच्यामुळे ते राष्ट्रवादी पक्षात गेले होते. मात्र, पक्षातील आंतरिक कलहामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सात आठ वर्षापूर्वी राम राम ठोकला होता. डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत अकोला येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरातील विश्रामगृहात हा छोटेखानी समारंभ झाला होता. यावेळी भाजप नेते संजय धोत्रे, गोवर्धन शर्मा, डॉ. रणजित पाटील, हरिश पिंपळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
छगन भुजबळ यांचे समर्थक
डॉ. ढोणे हे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे कट्टर समर्थक मानल्या जायचे. त्यांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला होता.
आयुर्वेद आणि कबड्डीचा प्रचार
आयुर्वेद आणि कबड्डी खेळ प्रचार व प्रसारासाठी ते आयुष्यभर झटले. आदिवासी,ग्रामीण भागात त्यांनी आयुर्वेद व निसोर्गोपचार केंद्र,महाविद्यालय उभारले. विदर्भातील कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केळीवेळी गावातील कबड्डीला नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी सर्वोतोपरी मदत केली. पातूर आणि अकोट भागात त्यांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.
डॉ ढोणे आणि मित्र
माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, तुकाराम बिडकर, धनंजय मिश्रा,गणेश पोटे यांचे डॉ ढोणे यांच्या सोबत जिव्हाळ्याचे संबंध होते. हे सर्व एकत्र आले की, यांच्यातील जुन्या आठवणी,किस्से यांना उजाळा मिळायचा.वातावरण एकदम प्रसन्न आणि हास्याचे लोट वाहायचे,आता मात्र, डॉ ढोणे यांच्या जाण्याने सर्व निशब्द झाले आहे.
आठवणींची फोटो गॅलरी
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा