grand march: बचतगटाच्या महिलांचा एल्गार;प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा

अभियानांतर्गत महिलांच्या संस्था उभ्या करणे, महिलांची क्षमता बांधणी करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व शाश्वत उपजीविका निर्माण करणे आदी कार्य केल्या जातात.

A grand march led by Pratibha Avchar


अकोला: महिला विकासासाठी उमेद अभियानातील कर्मचारी व अधिकारी यांच्या सेवा बाह्य संस्थेकडे वर्ग न करता ,पूर्ववत कायम कराव्यात, या प्रमुख मागणीसाठी आज अकोल्यातील बचतगटाच्या महिलांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा समन्वयक प्रतिभा अवचार यांच्या नेतृत्वात भव्य मोर्चा काढला.


मोर्चात सहभागी महिलांनी जोरदार निदर्शने देवून, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी घोषणाबाजी केली.यानंतर मागण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळाने सोपविले.


अभियान राज्यात २०११ पासुन


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात २०११ पासुन सुरु आहे. अभियानांतर्गत महिलांच्या संस्था उभ्या करणे (बचतगट,ग्रामसंघ व प्रभागसंघ), महिलांची क्षमता बांधणी करणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे व शाश्वत उपजीविका निर्माण करणे, हे चार प्रमुख कार्य पार पाडले जात आहे. या कामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अभियानाने मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शिके नुसार राज्य,जिल्हा, तालुका प्रभाग व ग्रामस्तरावर अभियान कक्षाची स्थापना व संरचना केली आहे. योजनेअंतर्गत राज्यात ४७८२०१ बचत गट तयार झाले आहे.



काय आहेत मागण्या


*कर्मचाऱ्यांची पुर्ननियुक्ती थांबली आहे त्यांना तात्काळ पुर्ननियुक्ती मिळावी.


 *ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य   सचिव यांना पदावरून तात्काळ हटविण्यात यावे,  


*उमेद अभियानाच्या मूळ मनुष्यबळ संसाधन धोरणानुसारच सर्व कंत्राटी कर्मचाच्यांची पदे कायम ठेवण्यात यावी,  याप्रमुख मागण्यासह इतर प्रलंबित मागण्या यावेळी महिलांनी उपस्थित केल्या.






टिप्पण्या