- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
विदर्भावर होत असलेला अन्याय व इतर राज्यांच्या तुलनेत विज विदर्भात तयार होत असुनही कशी महागडी आहे,यावर चर्चा झाली.
अकोला: अकोट तालुक्यातील पणज येथे शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते ललित बहाळे यांच्या उपस्थितीत विदर्भ राज्य आंदोलन समितीचा विदर्भ संकल्प दिवस पाळण्यात आला.पणज गावात यासंदर्भात मोठी सभा पार पडली.
सभेला संबोधित करताना बहाळेे यांनी स्वतंत्र विदर्भ का पाहिजे व विदर्भातील जनतेवर वीज बिला बाबत होत असलेला अन्याय ,शेतीच्या सद्यस्थितील प्रश्नावर मार्गदर्शन केले.
वि. रा. आ. समितीचे जिल्हा समन्वयक सतीष देशमुख यांनी १० ऑक्टोबर १९५५ रोजी न्यायमुर्ती फजल अली आयोगाच्या शिफारशी व विदर्भावर होत असलेला अन्याय व इतर राज्यांच्या तुलनेत विज विदर्भात तयार होत असुनही कशी महागडी आहे, याची सविस्तर माहीती दिली.
सभेला जउरद्दीन शेफुद्दीन, सुरेश दळवी, ईमायत हुसेन तफज्जुल हुसेन, हारुन पहेलवान, दादासाहेब देशमुख, मुकुंद आकोटकार, श्याम देशमुख, अब्दुल जाहीद, पंढरीनाथ राऊत, फयाज ऊद्दीन ग्यासऊद्दीन अब्दुल रशिद,संतोष अस्वार, मोतीराम सावीकर, संजय गवळी, अजमद खा सत्तार खा, जागिरऊद्दीन शहीर ऊद्दीन,
निसार बेग पाथ वाले, विश्वनाथ केदार, नयमोद्दिन दुकानवाले, शेख दाऊद शेख ईर्शाद, शेख इलियाज शेख रहमान, यशुरूद्दीन जमीरऊद्दीन, सुरेश बेलोकार यांच्यासह पणज गावातील शेतकरी, शेतमजूर मोठ्या संख्येने सामील झाले होते. यावेळी वाढीव विजदर रद्द करा, लॉकडाऊन काळातील विजबिल न भरण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा