Divyanga's life :दिव्यांगाचे आयुष्य सक्षम होण्यासाठी विशेष अभियान राबवा -बच्चू कडू

जिल्हा स्त्री रुग्णालयात डिस्ट्रीक अर्ली इंटरवेशन सेंटरला पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट दिली. 



अकोला: बालकांमधील दिव्यांगत्व कमी करणे, तसेच शारिरीक वाढ  न होणे,  हदयसंबंधीत आजार असणे, अशा बालकावर वेळीच उपचार करुन त्यांचे पुढील आयुष्य सक्षमपणे घालविता यावे. यासाठी विशेष अभियान राबवावे, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षणमहिला व बालविकास इतर मागासवर्गसामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गविमुक्त जातीभटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याणकामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांनी दिले.


जिल्हा स्त्री रुग्णालयात डिस्ट्रीक अर्ली इंटरवेशन सेंटरला पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट दिली. व तेथे उपचार घेत असलेल्या लहान बालकांच्या पालकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजकुमार चव्हाण, शासकीय स्त्री रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षीका डॉ. आरती कुलवाल, डिस्ट्रीक अर्ली इंटरवेशन सेंटरचे डॉ. योगेश कराळे यांची उपस्थिती होती.


आतापर्यंत ज्या सेंटरला 1 हजार 273 बालकांनी भेट दिली आहे व 442 बालकांची येथे नोंद करण्यात आली आहे. काही बालकांमध्ये बोलण्याची समस्या, मानसिक अनारोग्य, दंत  विकृती, शारिरीक विकृती, दृष्टीदोष, हदयविकार इत्यादी समस्या आहे. या समस्यांवर उपचार या डिएईसी सेंटरमध्ये करण्यात येतात. या बालकांच्या समस्यांवर त्यांना योग्य उपचार करण्यासाठी पालकांच्या आर्थिक परिस्थिती  नसेल अशा बालकांवर उपचार करण्यासाठी विविध स्वंयसेवी संस्था व शासनाकडून मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 


शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व बाल संगोपन योजना अंतर्गत अशा बालकांना त्वरीत अर्थसहाय देण्यात यावे. यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राचे पुर्तता करुन प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. 


अशा बालकांसाठी  वर्षातून एकदा विविध स्पर्धा व आनंदमेळाव्याचे आयोजन करण्यात यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. डिस्ट्रीक अर्ली इंटरवेशन सेंटरचे जाकीर अहमद, सोनाली कचरे, पल्लवी मापारी, स्वप्नील गद्रे, चंद्रकांत केन्दे, साजीद्दिन नसरुद्दिन सिमा मेश्राम ही टिम दिव्यांग बालकांवर उपचार करण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत. 

टिप्पण्या