bjpkisaanrally:मुख्यमंत्री तुम्ही खुशाल वर्क फ्रॉम होम करा,पण शेतकऱ्यांची थट्टा करू नका; अनिल बोंडे यांचा उध्दव ठाकरेंना सल्ला

मुख्यमंत्री तुम्ही वर्क फ्रॉम होम करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांसाठी काही करायचे असेल तर करा, पण शेतकऱ्यांची थट्टा करू नका.



अकोला: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करा, असे सांगून शेतकरी व मजुरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला असल्याचा असा आरोप माजी कृषी मंत्री व भाजपा राष्ट्रीय किसान आघाडीचे अध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी केला. 



बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथे बुधवारी आयोजित किसान सन्मान ट्रॅक्टर रॅलीसाठी आले असता,प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते.


मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आयोजित कृषी संशोधन आणि विकास परिषद उदघाटन प्रसंगी ऑनलाइन सभेत शेतकऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करता येण्यासाठी काही प्रयत्न होवू शकतात का, असे विधान केले होते. या मुद्द्यावर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री हे शेतकऱ्यांची थट्टा करीत असल्याचे म्हंटले.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधी शेतीचा अभ्यास करावा. मग शेतीवर बोलावे. कापूस जर वेचायचा असेल तर ते वर्क फ्रॉम होमने वेचला जाणार आहे काय. ओलित घरी बसून करता येईल का, असे बोंडे उपरोधात्मक म्हणाले.  


वर्षभरापूर्वी ठाकरे म्हणाले होते की , पंचनामे न करता शेतकऱ्यांना २५ हजार रुपये आणि बागायतदार यांना ५० हजार रुपये मदत करू. पण ठाकरे हे आता विसारलेत. मुख्यमंत्री तुम्ही वर्क फ्रॉम होम करा आणि शेतकऱ्यांना मदत करा, शेतकऱ्यांसाठी काही करायचेच असेल तर करा, पण शेतकऱ्यांची थट्टा  मात्र करू नका, असा प्रेमळ सल्ला बोंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला.


हे सुध्दा वाचा:केवळ मोदी द्वेषामुळे विरोधकांचा कृषी विधेयकाला विरोध- अनिल बोंडे


टिप्पण्या