BJPKisaan rally:केवळ मोदी द्वेषामुळे विरोधकांचा कृषी विधेयकाला विरोध - अनिल बोंडे यांचा आरोप

बोंडे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून, दोन नवीन ट्रॅक्टरचे पूजन केले. तसेच शेतकऱ्यांचा सन्मान केला.रॅलीचे स्वागत शेतकऱ्यांनी उत्साहात केले.




भारतीय अलंकार

अकोला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा विधेयक मांडून शेतकऱ्यांना नवीन दालन उपलब्ध करून दिले. परंतू, शेतकऱ्यांच्या नावावर राजकारण करणारे नेते केवळ नरेंद्र मोदी यांना याचे श्रेय मिळेल, म्हणून मोदी व भाजप सोबत द्वेषपूर्ण राजकारण देशात सुरू केल्याचा घणघणाती आरोप भाजपा किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांनी केला. मात्र, शेतकरी राजा हा जागृत झाला असून, आपलं कल्याण करणारे सरकार कोणते हे त्यांना समजत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी संपूर्ण देश आहे,अशी पुष्टी त्यांनी यावर जोडली.



केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात अकोला जिल्हा व भाजपा  शेतकरी आघाडीच्या वतीने बुधवारी निंबा फाटा येथे आयोजित किसान सन्मान ट्रॅक्टर रॅली प्रसंगी शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर हे होते.



डॉ बोंडे पुढे म्हणाले की, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती, राज्यपाल, सीबीआय, न्यायालय, निवडणूक विभाग यांच्यावर टीका करण्याची विरोधकांना सवय झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्व जाती धर्म पंथाचा पाठिंबा मिळणे, हेच विरोधकांची डोकेदुखी आहे. स्वतःला कायदे तज्ञ म्हणवून घेणारे पंतप्रधान व राज्यपाल यांच्या विषयी अपशब्द व  भाषेचा वापर करून आपली मनोवृत्ती प्रगट करत असल्याचा आरोप सुद्धा अनिल बोंडे यांनी केला.


स्वातंत्र्य काळानंतर आज देशात शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची सुरुवात झाल्याचे आपल्या आत्मचरित्रात उल्लेख करतात. परंतू, सभागृहात हे बोलत नाहीत. नरेंद्र मोदी हे 'सबका साथ सबका विकास सबका विश्वास' या दिशेने काम करीत असल्यामुळे त्यांच्या विरोधात आज सगळे एकत्र येऊन देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे,असा आरोप बोंडे यांनी केला.


शेतकऱ्यांचे कल्याण व्हावे, शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतकऱ्याला आपला शेतमाल देशात कुठेही विकण्याची परवानगी असावी, यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. याचा प्रचार व प्रसार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी करावा, पंजाब सोडून देशभरात शेतकऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न काँग्रेस व त्यांचे सहकारी पक्षांनी केला. परंतु, प्रयत्न अयशस्वी झाला. महाराष्ट्रात या कायद्याची अंमलबजावणी करण्या संदर्भात अध्यादेश काढण्यात आला. परंतू शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली राष्ट्रवादी'च्या मंत्र्यांनी याला स्थगिती दिली. 



परंतु केंद्राने लोकसभा राज्यसभेने बहुमताने संसदेमध्ये बिल पास केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करणे प्रत्येक राज्याच्या कर्तव्य असताना केवळ राजकारणापायी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असून अन्यायकारक आहे. या विरोधात शेतकरी रस्त्यावर आल्यास परिणाम भोगावे लागेल, असा  इशारा सुध्दा डॉक्टर  बोंडे यांनी दिला.



यावेळी जिल्हा भाजपाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आपल्या प्रभावी  भाषणात शेतकऱ्यांच्या हितार्थ असलेला कृषी विषयक कायदे या विषयावर मार्गदर्शन केले. अकोला जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यानंतरही राज्य शासनाने सर्व्हे, पंचनामे न करणे हा प्रकार निंदनीय असून, मानवतेच्या दृष्टीने चुकीचा आहे, असे रणधीर सावरकर यांनी म्हंटले.अकोला जिल्ह्यात शेतकरी सन्मान ट्रॅक्टर रॅली साठी डॉक्टर अनिल बोंडे येऊन शेतकऱ्यांचा उत्साह वाढवला याबद्दल आमदार सावरकरांनी डॉ बोंडे यांचे आभार व अभिनंदन केले.


मंचावर भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, माजी महापौर विजय अग्रवाल, शामराव शेलार, श्रीकृष्ण मोरखडे, अमर साबळे, जयंत मसने, माधव मानकर, ललित समदूरकर, विलास पोटे, रामदास लांडे, अशोक गावंडे, राजेश नागमोते, राजेश रावळकर, महेंद्र पेजावर ,   योगेश पटोकार, दिलीप सांगळे, डॉक्टर शंकरराव वाकोडे, आनंद ठाकरे, शेखावत अली जागीरदार, सुभाष अगरवाल,  चंद्रकांत माळी, शामराव पोहरे, मंगेश सांगवे, दिलीप पटोकार, संजय अडघते आदींची उपस्थिती होती.





टिप्पण्या