- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
*कोविड -19 च्या संदर्भात लक्षणे नसल्यास खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्यास प्रवेश देण्यात येवू नये
अकोला: कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत महसूल व वन विभागाच्या सूचनेनुसार रविवार 25 ऑक्टोबर पासून व्यायामशाळा (Gymnasiums) व इनडोअर खेळ सुरु करण्याबाबतचे आदेश प्रतिबंधात्मक आदेश अटी व शर्तीच्या अधिन राहून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहे.
काय आहेत नियम व अटी
*जिम्नॅशियम व इनडोअर खेळ याठिकाणी गर्दी टाळण्यासाठी व सोशल डिस्टंनसिंगच्या नियमांचे पालन करण्यासाठी सरावाकरिता आवश्यक तेवढयाच मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा
*सर्वांनी मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील
*वय वर्ष १० वर्षाच्या आतील मुलांना तसेच ६५ वर्षावरील व्यक्तींना प्रवेशास निषेध राहील
*सरावास येणाऱ्या खेळाडू तसेच कर्मचारी यांची प्रवेशद्वाराजवळ थर्मल स्क्रिनींगद्वारे तपासणी करण्यात यावी
*इनडोअर हॉलमध्ये सराव करतांना दारे, खिडक्या उघडी ठेवण्यात यावी तसेच ए.सी. चा वापर टाळण्यात यावा,
*मैदानात तसेच इनडोअर हॉल येथे वारंवार निर्जंतूकीकरण करण्यात यावे,
*खेळासाठी वापरण्यात येणारे क्रीडा साहित्य वापरण्यापूर्वी व वापरानंतर निर्जंतुकीकरण करणे बंधनकारक राहील,
*मैदानाच्या प्रवेशद्वारावर तसेच मैदानावर व इनडोअर हॉल येथे ठिकठिकाणी हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध करणे बंधनकारक आहे,
*सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे,
*कोविड -19 च्या संदर्भात लक्षणे नसल्यास खेळाडूंना प्रवेश देण्यात यावा. ताप, सर्दी, खोकला यासारखी लक्षणे असल्यास प्रवेश देण्यात येवू नये,
*कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने तसेच क्रीडा विभागाकडून निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील.
हे आदेश जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागाकरीता लागू राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा