- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
काल रात्री १०.३० च्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून आपसात वाद झाल्याचे आरोपींनी सांगितले.
अकोला: येथील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट नजीक निर्माणाधीन पुलाजवळ गुरुवारी रात्री शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कुख्यात गुंड मोनू काकडची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. ही घटना दारू पिण्याच्या क्षुल्लक वादातून घडल्याचे आता समोर आले आहे. हत्या करण्या मागे ऋषिकेश बाबर, सुहास काकड ही नाव सध्या समोर आली आहेत.
पोलिसांनी तपास चक्रे फिरवून,२ आरोपींना ताब्यात घेतले आहे.आरोपींची चौकशी केली असता ,काल रात्री १०.३० च्या सुमारास दारू पिण्याच्या कारणावरून आपसात वाद झाल्याचे आरोपींनी सांगितले.
मोनू काकडची या भागात मोठी दहशत होती. अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल होते. अज्ञात व्यक्तीकडून गजानन उर्फ मोनू काकडची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे आज सकाळी समोर आले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला होता.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा अंदाज प्रथमदर्शनी पोलिसांनी व्यक्त केल्या होता.या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा उत्तम कामगिरी बजावत दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या आरोपींची चौकशी सुरू असून,घटने मागील नेमके काय कारण आहे हे निष्पन्न होईल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा