- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
मोनू काकडची या भागात मोठी देहशत होती. तर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत
अकोला: येथील न्यू तापडिया नगर रेल्वे गेट नजीक निर्माणाधीन पुलाजवळ गुरुवारी रात्रीच्या सुमारास गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात गुंड मोनू काकडची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे.
मोनू काकडची या भागात मोठी देहशत होती. तर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
अज्ञात व्यक्तीकडून गजानन उर्फ मोनू काकडची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली असावी,असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला आहे.मात्र, ही हत्या कोणी केली हे अद्याप कळू शकले नाही.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने पूर्ववैमनस्यातून हत्या झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला .या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने एका संशयिताला ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राप्त झाली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा