Akola crime:नोकराचे अपहरण करणारे बडे आरोपी फरार ;पोलिसांच्या तपासाला वेग, गुन्ह्यात केली वाढ

आता या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी २ आरोपी विरुद्ध अपहरण, डांबून ठेवणे आणि अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत पोलिसांनी  विविध गुन्हे दाखल केले आहेत.

                                           crime


अकोला :-अकोल्यातील एका बड्या मद्य विक्रेत्याच्या मुलाने दुकानात काम करणाऱ्या एका नोकराचे सिने स्टाईल अपहरण करून, त्याला मारहाण केल्याची घटना घडली. आता या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी २ आरोपी विरुद्ध अपहरण, डांबून ठेवणे आणि अट्रोसिटी ऍक्ट अंतर्गत पोलिसांनी  विविध गुन्हे दाखल केले आहेत. २ लाखाच्या आर्थिक व्यवहारासाठी हा प्रकार घडल्याचा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे.


अकोल्यातील एका मद्य विक्रेत्याने आपल्या मुलाला आणि मॅनेजरला, आपल्याच किरकोळ विक्री देशी दारूच्या दुकानात काम करणाऱ्या नोकराला ७ ऑक्टोबरला सुमारे १वाजताच्या दरम्यान, अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या भागीरथ वाडी, येथे रहिवासी असलेल्या २ लाख रुपयांची थकीत मद्याची रक्कम वसूल करण्यासाठी पाठविले होते. 


मात्र, रक्कम वसूल न झाल्याने पित्त खवळलेल्या मद्य विक्रेत्याच्या मुलाने आपल्या व्यवस्थापकाच्या मदतीने, नोकराला बळजबरीने आपल्या महागड्या पांढऱ्या रंगाच्या कारने अपहरण केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 


विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मद्य विक्रेत्याच्या व्यवस्थपकाच्या सांगण्यावरून अवैद्यरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या वेगवेगळ्या इसमांंना उधारीवर २ लाख रुपयांच्या देशी दारूच्या पेट्या देण्यात आल्या होत्या, परंतु उधारीवर देण्यात आलेल्या दारूची रक्कम वसूल करण्यात उशीर झाल्याने, व्यवस्थापकाने हात वर करून मद्य विक्रेत्याला उधारीवर विक्री केलेल्या दारूची रक्कम दुकानात काम करणाऱ्या नोकरानेच हडप केल्याचे दर्शविले. त्यावरून मद्य विक्रेत्याच्या मुलाने आणि व्यवस्थापकाने, भागीरथ वाडीत राहणाऱ्या  नोकराच्या घरी जाऊन त्याला सोबत घेतले. बायपास चौक स्थित एका देशी दारूच्या दुकाना समोरील रोड वरून महामार्ग, पोलीस मुख्यालय, दक्षता नगर चौक, शाहिद स्मारक चौक, नेहरू पार्क चौक, सिव्हिल लाईन चौक मार्गे त्याला एका देशी दारू दुकानात नेऊन मारहाण केली. 


त्यानंतर मद्य विक्रेत्याच्या मुलाने त्या नोकराला  आपल्या कार्यालयात नेऊन त्याठिकाणी सुध्दा मारहाण केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

त्यानंतर मद्य सम्राटाच्या मुलाने आणि व्यवस्थपकाने पीडित नोकराच्या मुलाला नोकराच्याच फोनवरून कॉल लावून नोकराचे बँक पासबुक आणि आधार कार्ड  आणायला लावले. त्यावरून पीडित नोकराचा मुलगा हा पासबुक आणि आधार कार्ड घेऊन सांगितल्या ठिकाणी पोहचला. तेथे पोहचल्यावर मुलाने आपल्या वडिलांना (पीडित नोकर) फोन लावला असता, मद्य विक्रेत्याच्या व्यवस्थापक पीडित नोकराचा मोबाईल घेऊन आला आणि नोकराच्या मुलाला तुझ्या वडिलांनी फोन चार्जिंगसाठी लावला आहे,आणि ते बाहेर कामानिमित्त गेले असल्याचे सांगत,पासबुक आणि आधार कार्ड माझ्याकडे देऊन टाक असे म्हणून आधार कार्ड आणि पासबुक व्यवस्थपकाने स्वतःकडे घेऊन, मुलाला निघून जाण्यास सांगितले. 


त्यानंतर पिडीत नोकराला रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या एका ऑफिसमध्ये नेऊन पुन्हा मारहाण करण्यात आल्याची माहिती केली. त्यानंतर गड्डम प्लॉट येथील एका वकीलाच्या ऑफिस मध्ये नेऊन, पीडित नोकराचे पातूर तालुक्यातील मौजे तुलंगा येथील  शेताची इसार पावती २ लाख रुपयांमध्ये ,केला असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून  प्राप्त झाली.


आणि त्यानंतर पीडित नोकराला ७ नोव्हेंबर  पर्यंत २ लाख रुपये परत आले नाही तर, तुझ्या शेताची खरेदी करून, शेत हडपून टाकण्याची धमकी आरोपींनी पीडितला दिली. हा सर्व प्रकार घडल्यावर, मद्य विक्रेत्याच्या मुलाने आणि व्यवस्थपकाने पीडित नोकराला चार चाकी गाडीत बसवून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून एका अज्ञात स्थळी नेऊन,त्याला विना अन्नपाणी डाबून ठेऊन, दुसऱ्या दिवसी ३ वाजता डोळ्यावर पट्टी बांधून जठारपेठ परिसरात सोडुन दिल्याची माहिती खुद्द पीडित नोकराने दिली आहे.


आपली सुटका झाल्यावर घडल्या प्रकारची लेखी तक्रार घेऊन पोलीस स्टेशन जुने शहर येथे पीडित नोकर गेला असता,त्याने लिहून आणलेली तक्रार न घेता, साधी मारहाणीची तक्रार दाखल करून, ८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री नंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,हे प्रकरण प्रसार माध्यमांनी उचलून धरल्यामुळे अखेर आज  शनिवारी या प्रकरणी तपासाअंती आणखी गुन्हे वाढविले. त्यात प्रामुख्याने भांदवी ३४२ (डांबून ठेवणे), ३६५ (अपहरण )आणि अट्रोसिटी ऍक्ट यांचा समावेश आहे. या प्रकरणी आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


टिप्पण्या