- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
पण बच्चू कडूंची हमी कोण घेणार? असा सवाल देखील संजय धोत्रे यांनी यावेळी उपस्थित केला.
... So Bachchu Kadu is welcome in BJP-Sanjay Dhotreअकोला: राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू भाजपमध्ये आल्यास त्यांचं स्वागतच असल्याचं केंद्रीय मनुष्यबळ मंत्री संजय धोत्रे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजपा एनडीए सरकारने कृषि सुधारणा विधेयक 2020 संसदेचे दोन्ही सभागृहात पारित करून ऐतिहासिक निर्णय घेतला. यासंदर्भात केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री आमदार संजय धोत्रे यांची पत्रकार परिषद सर्किट हाऊस येथे सोमवारी आयोजित केली होती. पत्रकार परिषदेत एका प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी बच्चू कडू भाजपा मध्ये आल्यास निश्चितच स्वागत आहे असे म्हणाले.
या विधानाला जोडूनच, पण बच्चू कडूंची हमी कोण घेणार? असा सवाल देखील संजय धोत्रे यांनी यावेळी उपस्थित केला. बच्चू कडूंनी कृषी कायद्यात केंद्राने दोन बदल केल्यास भाजपमध्ये प्रवेश करण्याचं काल वक्तव्य एका वृत्त वाहिनीशी बोलताना केलं होतं. या मुद्द्यावर बच्चू कडूंच्या सुचनांवर विचार करणार असल्याचं धोत्रे म्हणाले.
तर कांद्यावरील निर्यात बंदी बिहार निवडणुकी नंतर उठणार का या प्रश्नाचं उत्तर देतांना बंदी लवकर उठणार असल्याचं संजय धोत्रे यांनी सांगितले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा