- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भाजपच्या केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध
अकोला: तालुका काँग्रेस कमिटीच्या विद्यमाने सिव्हिल लाइन्स परिसरात भाजपच्या केंद्र सरकारने पारित केलेल्या तीन शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध दर्शविण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले.
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष डॉक्टर सुभाष कोरपे यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या तीन शेतकरी विरोधी कायद्यांना विरोध का आहे याचे सुंदर विवेचन केले. ते म्हणाले, या कायद्यान्वये कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था नष्ट होणार असून, शेतकऱ्यांच्या शेतमालाला ना हमी भाव मिळणार ना बाजार भाव मिळणार. पुढे कामगार, मजूर, अडते, मुनीम, हमाल यांच्यासह लाखो लोक बेरोजगार होणार. त्याचप्रमाणे बाजार व्यवस्था मोडीत निघताच राज्याच्या महसुलात घट होणार आणि राज्याचे उत्पन्न कमी होऊन त्याचा विपरीत परिणाम ग्रामीण व शेती विकासावर होणार.
पुढे कोरपे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना करार शेतीच्या नावाखाली फसवून त्यांच्याच शेतात कामगार बनवले जाणार. करार शेती बाबत त्यांनी सांगितले की, काही वाद झाल्यास शेतकऱ्याला न्यायालय व नोकरशाही कडे पायपीट करावी लागेल. साठेबाजीला आळा घालणारा कायदाच अस्तित्वात राहणार नाही. त्यामुळे मुठभर व्यापारी साठेबाजी करणार व बाजार तेजीत येतात तो विकून भरपूर नफा मिळविणार.
जमीन कसणारा, बटईन शेती करणारा व शेतमजूर यांना या कायद्यात कोणतेही संरक्षण नाही. शेती व बाजार व्यवस्था हे विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत असूनही ही केंद्राच्या मोदी सरकारने एकतर्फी पद्धतीने हा कायदा बनवल्याने हा कायदा संविधान विरोधी ठरतो असे डॉक्टर कोरपे म्हणाले. या कायद्यामुळे शेतकऱ्याला कायद्याच्या कचाट्यात अडकून फसवणूक केली जाण्याचा खूपच मोठा धोका आहे, असा गंभीर इशारा देखील डॉक्टर कोरपे यांनी शेवटी दिला.
या कार्यक्रमाकरिता सिव्हिल लाईन परिसरातील येणाऱ्या-जाणाऱ्या महिला, विद्यार्थी, शेतकरी नागरिक यांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला व एकंदरीत 2500 सह्या गोळा झाल्या. काँग्रेस पक्षाचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातून दोन कोटी सह्यांचे निवेदन राष्ट्रपतींना पाठवून हे तीनही शेतकरी विरोधी कायदे हे सरकारला परत घेण्यास काँग्रेस पक्ष भाग पडणार आहे.
आजचे स्वाक्षरी अभियान यशस्वी करण्यासाठी डॉक्टर सुभाषचंद्र कोरपे, सुनील घावट, हेमंत देशमुख, कपिल रावदेव, अशोक अमानकर, सागर कावरे, बबनराव चौधरी, राजीव नाईक, बाबुराव इंगळे, वैशाली संतोष चव्हाण, संतोष शास्त्री, भूषण टाले पाटील, मोहम्मद युसुफ, तसवर पटेल, संजय मेश्रामकर, प्रमोद डोंगरे, सौ पुष्पा विनायक देशमुख, विभा राऊत, मनीषा महल्ले, प्रकाश तायडे आणि सदानंद काकड यांनी सहभाग घेतला. सुनील घावट यांनी आभार प्रदर्शन केले.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा