- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्या व सातत्याने या मागणीला समर्थन करणारे केवळ मोदी द्वेषाने व भाजपाच्या विरोधाला विरोध म्हणून शेतकरी सुधारणा विधेयक २०२० ला स्थगिती देण्याचे महापाप महाविकास आघाडीने केले.
अकोला: महाराष्ट्रातील शेतक-यांना देशोधडीला लावणा-या महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांचे स्वातंत्र्य हिराविणारा स्थगिती आदेश काढला आहे. हा ३० सप्टेंबर रोजी दिलेला स्थगिती आदेश रदद करून केंद्र सरकारने घेतलेला कृषी विधेयक निर्णय हा शेतक-यांच्या हिताचा असून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने त्वरीत त्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, या बाबतचे निवेदन अकोला भाजपा तर्फे भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर, आ. गोवर्धन शर्मा, तेजराव थोरात, श्रावण इंगळे, शंकर वाकोडे आदींच्या नेतृत्वात अकोला तहसीलदार लोखंडे यांना सादर करण्यात आले. तसेच तिघाडी शासनाने काढलेल्या स्थगिती आदेशाची होळी करण्यात आली.
११ ठिकाणी आंदोलन
शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने स्वतंत्र देऊन शेतकऱ्याचा शेती माल त्यांनी ठरवलेल्या भावात कुठेही विकण्याची मुभा देण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. शेतकऱ्यांचे कैवारी म्हणणाऱ्या व सातत्याने या मागणीला समर्थन करणारे केवळ मोदी द्वेषाने व भाजपाच्या विरोधाला विरोध म्हणून शेतकरी सुधारणा विधेयक २०२० ला स्थगिती देण्याचे महापाप महाविकास आघाडीने केले. केवळ गप्पांचा बाजार व भ्रष्टाचार या शिवाय कोणतेही काम आघाडी सरकार करत नाही चांगल्या कामाला विरोध हेच एकमेव धोरण ठेवून शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीची वाटचाल सुरू आहे.
covid-19 सेंटर मध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. मंदिर बंद आहे. अठरा पगड जाती बारा बलुतेदार समाजाला आधार देण्याचे काम सरकार करत नाही. शेतकरी राजाला स्वावलंबी होण्यापासून वंचित ठेवण्याचा महापापच्या विरोधात आज भारतीय जनता पक्षाने ११ ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आज आंदोलन करण्यात आले असल्याचे भाजपा सूत्रांनी सांगितले.
यांच्या नेेतृत्वात आंदोलन
जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी जिल्ह्यात हे आंदोलन झाले. जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, भाजपा ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे ,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल ,महापौर अर्चना मसने, तेजराव थोरात, किशोर पाटील ,श्रावण इंगळे, नयना मनतकर ,हरिनारायण माकोडे, कुसुम भगत ,चंदा शर्मा ,जयश्री कुंडकर, मोनिका गावंडे, माया कावरे, योगिता पावसाळे, सचिन देशमुख, माधव मानकर, अक्षय गंगाखेडकर, संजय जिरापुरे, डॉक्टर विनोद बोर्डे ,केशव ताथोड, रमेश खोपरे अंबादास उमाळे, कनक कोटक, अशोक गावंडे, भूषण कोकाटे, महेंद्र पेजावर, समरजीत समाजकर, अशोक गावंडे, रमण जैन ,उमेश गुजर , उमेश पवार ,अमरसिंग भोसले, मनीराम टाले , श्रीकृष्ण मोरखडे, महादेव काकड, राजू काकड ,अमोल साबळे, संतोष पांडे ,गणेश अंधारे, राजेंद्र गिरी, सतीश ढगे, व्यंकट ढोरे ,एड. देवाशीष काकड, अमोल गोगे आदींच्या नेतृत्वात जिल्ह्यात विविध ठिकाणी राज्य शासनाच्या विरोधात केंद्र सरकारच्या निर्णयाच्या स्थगिती देणाऱ्या आदेशाची होळी करून निदर्शने देण्यात आली.
शेतकऱ्यांचा सहभाग
आज भाजपाच्या आंदोलनात दहा हजार पेक्षा जास्त शेतकरी सहभाग घेऊन सरकारच्या कृतीचा निषेध व्यक्त केला. वेगवेगळ्या माध्यमातून सरकारच्या प्रत्येक बाबी केवळ जनविरोधी असल्यामुळे भाजपाने सांकेतिक आंदोलन केले. यापुढे तीव्र आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी दिला. तसेच या आंदोलनात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी व भाजप कार्यकर्ते सहभागी झाल्याबद्दल आमदार सावरकर यांनी आभार व्यक्त केले आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे घेतलेले निर्णय व त्यांची यशस्वी पणे केलेली अंमलबजावणी यामुळे देशात अभिमानाने म्हटले जाते की, 'मोदी है तो मुमकीन है'.मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र क्रांती घडविणारे पाउल उचलले आहे. मात्र शेतक-यांबद्दल जराही आस्था नसलेल्या, दृट्टपी धोरणामुळे काँग्रेस आणि विरोधक केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचा अपप्रचार व राजकारण करीत असल्याचा आरोप यावेळी भाजपाने केला.
या नविन कायदयामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होऊन त्याला आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेतीमालाच्या विकी व बाजारपेठेचे स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतक-यांसाठी एक देश, एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतीमाल कुठेही आणि योग्य भावात विकण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे. पंतप्रधान मोदीनी एमएसपी कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याने स्पष्टपणे सांगितले आहे, या कृषी सुधारणा विधेयकामुळे शेतक-यांना ख-या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचे भाजपाने म्हंटले आहे
आंदोलनात प्रामुख्याने पवन बुटे, गणेश लोड, हिम्मत देशमुख, किशोर काकडे, दीपाल गोटूकडे, मंगेश सावंग, विनोद गवई, विशाल जैस्वाल, चंदू खडसे, सुभाष रायबोले, प्रभाकर गोमाशे, दत्ता पागृत, भारत काळमेघ, विजय राउत, गोपाल चावण, त्र्यंबक आखरे, सुभाष टिकर, किशोर कारले, राजूसिंग ठाकूर, देवेंद्र देवर, मुरली केवट, प्रदीप खोले, अभिमन्यू नळकांडे, गजेंद्र खोटरे, सुभाष गावंडे, तेजराव काटे, पंकज वाडीवले, संतोष मोहोरकर, मुरलीधर भाटकर, नंदकिशोर राठोड, अनिल गासे, गणेश पोटे, अतुल आवरे, गजानन राजभट यांनी सहभाग घेतला.
तेल्हारा तालुका व शहर भाजपाच्या वतीने महाविकास आघाडी शासनाच्या कृषी विधेयक स्थगीती पत्रकाची होळी करून निषेध करीत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तेल्हारा तालुका अध्यक्ष गजानन उंबरकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी तेल्हारा तालुका व शहर तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले. गजानन नळकांडे,महेंद्र गोयंनका, अनिल पोहणे, ओम सुईवाल, रवि गाडोदिया, पुंजाजी मानकर .ज्ञानेश्वर सरप. .धर्मेश भाऊ चौधरी ,पंकज देशमुख ,नरेश गंभीरे, प्रवीण येऊल, विशाल भुजबल, गजानन गायकवाड, प्रवीण राजनकर ,गणेश इंगोले, महिला आघाडी अध्यक्ष मोनिका वाघ, आरती गायकवाड, सुमित गंभीरे, श्रीकृष्ण पवार, दीपक वानखडे, अनिकेत ढवळे, दीपक मोडक ,सोनू शिंदे,मनोज पालीवाल,ऋषभ ठाकूर उपस्थित होते.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा