Shivsena-BJP: शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली काम करत असल्याने मंदिरे अजूनही बंदच-आमदार शर्मा

शिवसेना काँग्रेसच्या दबावाखाली काम करत असल्याने मंदिरे अजूनही बंदच-आमदार शर्मा

Temples are still closed as Shiv Sena is working under pressure from Congress-MLA Sharma


अकोला  एकीकडे सरकार रेस्टॉरंट सुरू करत आहे तर दुसरीकडे मंदिरे, धार्मिक स्थळे बंद ठेवण्यामागे सरकारचा उद्देश तरी काय आहे, हे तरी जाहीर करावे. की, शिवसेना  काँग्रेसच्या दबावाखाली काम करीत असल्यामुळे मंदिर खुली होत नाही आहे, असा सवाल श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी तथा भाजप आमदार गोवर्धन शर्मा  यांनी केला.



अनलॉक पाच मध्ये ऑक्टोबर मध्ये  महाराष्ट्रात धार्मिक स्थळे सुरू करण्यात यावी व यासंदर्भात नियमावली सरकारने तयार करावी, अशी मागणी श्री रामनवमी शोभायात्रा समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्याचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्याकडे केली आहे.


देशभरात महाराष्ट्र सोडून सगळीकडे धार्मिक स्थळे सुरू झाली असताना महाराष्ट्रात बंदी का असा प्रश्न उपस्थित करून आमदार शर्मा यांनी पुरोगामी  महाराष्ट्राच्या व संताच्या भूमीमध्ये असा प्रकार वेदनादायी असून एकीकडे सरकार सर्वत्र सुरू करत असताना धार्मिकतेबाबत  उद्धव ठाकरे व अजित पवार यांना काय वाकडे असा प्रश्न शर्मा यांनी उपस्थित केला.


धार्मिक संस्थांची परिस्थिती व धार्मिक भावनांची दखल घेऊन एक ऑक्टोंबर पासून धार्मिक स्थळे सुरू करावी व संत तसेच हरी भक्त पारायण वारकरी संप्रदाय तसेच सर्वसामान्य भक्ती सरदार व्यक्त करणाऱ्या व आराधना करणाऱ्या भक्तांची परीक्षा घेण्याचा प्रकार सरकारने करू नये. अन्यथा, सरकारला हे महागात पडेल, असा इशारा आमदार गोवर्धन शर्मा यांनी दिला. 



धार्मिक स्थळे मंदिरे सर्व भक्तांसाठी नियमावली जाहीर करून सुरू करावी, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे. सरकारच्या एका विनंतीवरून मंदिरात संस्थांनी आणि धार्मिक स्थळी मर्यादाचा पालन करून जर फक्त सण उत्सव साजरा करत आहे. त्यावेळी मंदिरात गर्दी करणार नाही, याची हमी मंदिर'चे ट्रस्टी घेत असताना सरकार मंदिरे का खुली करत नाही ,असा सवाल करून आमदार शर्मा यांनी एक ऑक्टोंबर पासून सरकारने मंदिरे सुरू करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली आहे.



टिप्पण्या