- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
serological survey:सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाअंतर्गंत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्त नमूने संकलन Collection of blood samples in the Collectorate under serological survey
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाअंतर्गंत जिल्हाधिकारी कार्यालयात रक्त नमूने संकलन
Collection of blood samples in the Collectorate under serological survey
अकोला,दि.15 : जिल्ह्यात कोविड-19 या विषाणू संसर्गाची स्थिती जाणून घेण्यासाठी सिरॉलॉजिकल सर्वेक्षण करण्यात येत असून या सर्वेक्षणाची सुरुवात सोमवार (दि.7) पासून झाली आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तहसिलदार विजय लोखंडेसह 50 अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रक्त नमूने घेण्यात आले.
कोरोना काळात मागील मार्च महिन्यापासून जिल्हाधिकारी यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त असलेले इतर कर्मचारी अथक सेवा देत आहे. अशा फ्रन्टलाईन अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रक्ताचे नमूने आज घेण्यात आले आहे.
जिल्ह्यात प्रत्यक्ष ज्या तपासण्या झाल्या त्या व्यतिरिक्त किती लोकांपर्यंत कोविड चा संसर्ग पोहोचला?, किती जणांना त्याची बाधा होऊन त्यांच्या शरिरात जैव प्रतिकार शक्ती तयार झाली? त्यातून समुहाची प्रतिकारशक्ती तयार झाली की नाही? यासंदर्भात या सर्वेक्षणातून माहिती मिळणार आहे. असे सर्वेक्षण भारतीय वैद्यकीय अनुसंधानतर्फे देशात सध्या 80 जिल्ह्यात सुरु आहे. मात्र अकोला जिल्हा प्रशासनाने अकोला जिल्ह्यातही हे सर्वेक्षण राबविण्याची भूमिका घेतली असून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सोमवार (दि.7) पासून सुरुवात झाली आहे.
त्यासाठी एक लाखामागे 100 व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने घेऊन सर्वेक्षण केले जाईल. शहरी भागातून 1400 रक्त नमूने तर ग्रामीण भागातून 1400 असे एकूण 2800 रक्त नमूने घेण्यात येणार आहे. असे रक्त नमुन्यांच्या चाचण्या करण्यासाठी ज्यांना आतापर्यंत कोरोना झालेला नाही अशा लोकांच्या रक्ताचे नमुने वेगवेगळ्या समुहातून घेण्यात येतील. त्यानुसार प्रतिबंधित क्षेत्रातील, शहरी –ग्रामिण, अति अजोखमीचे व्यक्ती, विविध वयोगटातील व्यक्ती या प्रमाणे विविध गटांमधील व्यक्तिंच्या रक्ताचे नमुने आरोग्य यंत्रणेमार्फत संकलित करुन चाचण्या केल्या जातील. या चाचण्यांमधून त्या त्या व्यक्तिच्या शरिरात तयार झालेल्या प्रतिजैविक पेशींबाबत माहिती मिळणार आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा