Samta sainik dal:समता सैनिक दल भडगाव शाखे तर्फे कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर

समता सैनिक दल भडगाव शाखे तर्फे
कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर 


भडगाव: नालंदा बुद्ध विहार,भडगाव येथे शुक्रवार,11 सप्टेंबर रोजी समता सैनिक दलाचे मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय संघटक धर्मभूषण बागुल या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.



अध्यक्षस्थानी  विजय निकम ( जिल्हा अध्यक्ष जळगाव) हे होते. तसेच भाईदास गोलाईत (जिल्हा सचिव ), किशोर डोंगरे (जिल्हा उपाध्यक्ष), सचिन शिरसाठ ( जिल्हा सहसचिव) यांचे सह चाळीसगाव तालुका शाखेचे तालुकाअध्यक्ष स्वप्नील जाधव तसेच सचिन गांगुर्डे,विष्णू जाधव, दीपक बागुल आदी चाळीसगावचे पदाधिकारी उपस्थित होते. 



या कार्यक्रमात भडगाव कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये सिद्धार्थ सोनवणे (तालुका अध्यक्ष), अजय सोनवणे (उपाध्यक्ष), राहुल शिरसाठ (सचिव), हर्षल सोनवणे (सहसचिव), सनि सोनवणे (कोषाध्यक्ष), तुषार शिरसाठ (प्रसिद्धी प्रमुख), अक्षय सोनवणे (संपर्क प्रमुख),  निलेश सोनवणे व सागर सोनवणे यांची सदस्य म्हणून यांची निवड करण्यात आली.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री वाल्हे , जुलाल सोनवणे ,पवार , भालेराव , जितेंद्र रायसिंग, अपूर्व पवार ,वानखेडे मयूर यशवंत नगर टीम सर्व यांचे सहकार्य लाभले. ग्रामिण भागातील बाळद, वडजी, वाक या गावातील कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते. 



कार्यक्रमाच्या मार्गदर्शक धर्मभूषण बागुल यांनी आपल्या मार्गदर्शनात समता सैनिक दलाची  माहिती दिली. 1916 ते 1956 बाबासाहेब जीवन प्रवासातील बाबासाहेब यांची राजकीय सामाजिक भूमिका याबद्दल सांगून समता सैनिक दलाचा उद्देश  व कार्य समजावून सांगितले.

बाबासाहेबांनी सांगितल्या प्रमाणे, समता सैनिक दल हे आपल्या राजकीय पक्षाची आघाडीची फौज आहे. म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सामाजिक) या नोंदणीकृत राजकीय पक्षाला वाढविणे व बाबासाहेबांना अपेक्षित असलेली  राजकीय लढाई यशस्वी करणे हे समता सैनिक दलाचे मुख्य धोरण असले पाहिजे .
त्यासोबतच तरुणांना संघटित करून सामाजिक समतेचा व न्यायचा लढा देखील देण्याचे काम या दलाला करायचे आहे. 


म्हणून निर्व्यसनी ,निस्वार्थी ,तळमळ असलेल्या आणि शिस्त पाळणाऱ्या सर्व समाजाच्या ,सर्व जाती धर्माच्या  तरुणांना या दलात सहभागी करून घ्या. या देशात जाती व्यवस्था  हीच खरी समस्या आहे.म्हणून जातींचा नाश करायचा असेल तर , बाबासाहेबांची ही सामाजिक व राजकीय चळवळ सर्व समाजांना समजावून सांगितली पाहिजे व एक जातीय चळवळ असे आपल्या चळवळीचे स्वरूप बदलविण्यासाठी आपण सर्वांनी जाणीव पूर्वक प्रयत्न केला पाहिजे.सर्वात अगोदर आम्ही भारतीय आहोत. सर्वात शेवटी ही भारतीयच आहोत हाच बाबासाहेबांनी दिलेला विचार घेवून सर्वांनी कामाला लागावे असे सांगून, सर्वांनी निस्वार्थी व सचोटी पूर्वक काम करून बाबासाहेबांनी दिलेले संकल्प साकार करायचे हेच ध्येय बाळगावे, हा संदेश दिला.


या प्रसंगी आयु.विजय निकम ,भाईदास गोलाईत ,स्वप्नील जाधव व यशराज निकम यांनी मनोगत व्यक्त केले.जाधव यांनी कार्यक्रमाचे संचलन केले.सर्वात शेवटी दलाने निर्धारित केलेली शपथ घेवून कार्यक्रमाची सांगता झाली,अशी माहिती
सिद्धार्थ सोनवणे (तालुकाध्यक्ष भडगाव)यांनी दिली.

टिप्पण्या