Raamnavmi shobhayatra samiti: गणेश विसर्जनवेळी मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांना रामप्रसादरूपी आर्थिक मदत

गणेश विसर्जनवेळी मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांना रामप्रसादरूपी आर्थिक मदत

श्रीरामनवमी शोभायात्रा समितीचा स्तुत्य उपक्रम
Ramprasad-like financial assistance to the families of the youth who died during the immersion of Ganesha


गणेश विसर्जन वेळी नागझरी व मोर्णा नदीत युवकांचा मृत्यू झाला होता. त्या परिवारांना  रामप्रसादच्या माध्यमातून  श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आर्थिक मदत करण्यात आली.



भारतीय अलंकार
अकोला: श्री रामनवमी शोभायात्रा समिती ही केवळ धार्मिक संस्था नसून,सोबतच संस्कार, प्रेरणादायी व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारी सामाजिक दायित्व  निभावणारी समिती आहे.  आमदार गोवर्धन शर्मा यांच्या नेतृत्वात सतत ३६ वर्षांपासून कार्यरत  समितीने अकोला पंचक्रोशी मध्ये हजारो परिवाराला आधार देण्याचं काम केले आहे. आज दहा जणांना रामप्रसादच्या माध्यमातून सामाजिक व आर्थिक सबलीकरण करून, नवीन दिशा प्रदान केल्याचे प्रतिपादन डॉक्टर अभय जैन केले.



श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने आज खंडेलवाल भवन येथे राम प्रसाद रुपी आर्थिक मदत वितरणाचा कार्यक्रम झाला. 



गणेश विसर्जनवेळी नागझरी व मोर्णा नदीवर युवकांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या परिवारांना आर्थिक मदत रामप्रसादच्या माध्यमातून  करण्यात आली. तसेच वेगवेगळ्या कारणांनी निधन झालेल्या व्यक्तींच्या परिवारांना रामप्रसाद आर्थिक मदतनिधी वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. 



कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विलास अनासने हे होते. समितीचे सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा, अशोक गुप्ता, ब्रिजमोहन चितलांगे, अनिल थानवी, डॉक्टर युवराज देशमुख, अनिल गरड, अजय शर्मा, सतीश ढगे, अमोल गोगे, तुषार भिरड, निलेश निनोरे, विजय इंगळे, सागर शेगोकार, प्रतुल हातवळणे, गिरीराज तिवारी ,उमेश गुजर आदी मंचावर विराजमान होते.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व स्वर्गीय मांगीलाल शर्मा यांच्या संस्कारातून व प्रेरणेतून नितीन राऊत हे पीडित वंचित यांना रामप्रसाद आर्थिक मदतीच्या माध्यमातून आधार देण्याचे काम करत आहे. 2020 या काळात श्री रामनवमी शोभायात्रा समितीने आतापर्यंत 472 जणांना मदत दिली. 
आज स्वर्गीय रुपेश आमले, स्वर्गीय कल्पेश आमले, स्वर्गीय सुभाष ढोले, स्वर्गीय हर्षल गवारे, स्वर्गीय दिलीप निखारे, स्वर्गीय मुकेश सेन, स्व. अनिल अंभोरे यांच्या कुटुंबियांसह आणखी दहा परिवारांना रामप्रसाद आर्थिक मदतनिधी वितरित करण्यात आली. जवळपास एकूण 80 हजार रुपयाची मदत तसेच विविध साहित्य वाटप करण्यात आले.  



भक्तांच्या सहकार्याने अकोलेकरांच्या प्रेम, विश्वास, सहकार्य व प्रभू रामचंद्राच्या भक्तीने नलनील, सुग्रीव, हनुमंत, जटायु , भरत, केवट ,शबरी, अंगद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, माता जानकी, कौशल्या, उर्मिला यांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून, राजे छत्रपती शिवाजी महाराज, आई अहिल्याबाई होळकर, राणी झाशी बाई ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, संत तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, नामदेव, सावतामाळी, कबीर, सूरदास ,रविदास महाराजांचा इतिहास साक्षीला ठेवून श्री रामनवमी शोभायात्रा समिती कार्य करते. 
समाजातील सर्व स्तरातील जात,  धर्म, पंथ विसरून सातत्याने समिती क्रियाशील राहते. प्रत्येकाला रामप्रसाद आर्थिक मदतीच्या माध्यमातून सबलीकरण करण्याचे काम सुरू असल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी सांगितले. या कार्यात मदत करणाऱ्या सर्व दानशूर , सर्व कार्यकर्ते हेच  रामप्रसाद आर्थिक मदत कार्याला बळ देणारे यशाचे भागीदार असल्याचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी म्हंटले. श्रीरामनवमी शोभायात्रा समिती सातत्याने कार्यरत राहील,अशी  ग्वाही आमदार शर्मा यांनी यावेळी दिली.



याप्रसंगी नितीन राऊत, टोनी शंकर ,जयराज, रमेश कोमलकर, हरिभाऊ काळे ,किशोर गायकवाड, एडवोकेट लखन बडदिया, विजय चौधरी, राजू चौधरी, राजेश रेड्डी ,वामनराव, अमोल इंगळे, विजय सातव, संजय आमले, मनीष सुरेखा, बबलू चौधरी, नितीन जोशी, नवीन गुप्ता, मोहन गुप्ता, राम ठाकूर ,पुष्पा वानखडे ,मनीषा भुसारी ,कल्पना अडचुले ,पद्मा अडचुले, मीराताई वानखेडे, चंदाताई शर्मा, बाळ टाले, किरण ढोले, वैशाली गवारे, सुनिता निखारे ,
सुभाष आमले, नथु अंभोरे, बेबीताई अंभोरे, राम खरात, अभिषेक मुरारका, मालती रणपिसे, ज्योति शर्मा, संतोष शर्मा ,सोनल शर्मा, वैशाली सावजी, ज्योती कोलटकर, बबलू सावंत, मनीष बाछूका, महेश चौधरी, आनंद चांडक, प्राध्यापक अनुप शर्मा ,कृष्णा शर्मा ,अर्चना शर्मा ,अनुप गोसावी, देवकिसन राठी, सागर तिवारी, संजय अग्रवाल, हेमंत शर्मा ,दिलीप मिश्रा ,डॉक्टर संजय ढोरे, रमेश अलकरी, संदीप वाणी, बाळकृष्ण बिडवई ,वसुधा बिडवई प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गिरीश जोशी, प्रास्ताविक गिरीराज तिवारी तर आभार प्रदर्शन नवीन गुप्ता यांनी केले.

टिप्पण्या