Public curfew:चार दिवसातच असं काय घडलं की,नितीन खंडेलवाल यांनी बदलले आपले मत!

चार दिवसातच असं काय घडलं की,नितीन खंडेलवाल यांनी बदलले आपले मत!



नितीन खंडेलवाल म्हणाले होते, "व्यापार बंद टालना है, बंद सोल्युशन नही है" 


सोशल मीडियावर व्हायरल होत आहे हा व्हिडीओ

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा

Link: चार दिवसात असं काय घडलं की बदलले मत



अकोला: विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी २२ सप्टेंबर रोजी एक प्रसिद्धी पत्रक काढून २५ ते २९ सप्टेंबर रोजी अकोला जिल्ह्यात जनता संचारबंदी करण्यात येत असून, याला जिल्हा,पोलीस आणि मनपा प्रशासनाचे पूर्ण समर्थन आहे, असे जाहीर केले.मात्र,अधिक मासाच्या प्रारंभी १८ ला विडीओ  ज्यामध्ये बंद करणे व्यापाऱ्यांना आता परवडणारे नाही. त्यापेक्षा शासनाने सांगितलेल्या नियम व अटी नुसार आपला व्यापार करावा, अश्या आशयाचे संबोधन केले होते. मात्र, अवघ्या चार दिवसातच अध्यक्षांचे मत कसे बदलले, असा प्रश्न सामान्य अकोलेकरांसह व्यापारी वर्गाला सुद्धा पडला आहे. १८ तारखेचा व्हिडीओ आज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. 




व्यापार्‍यांची संघटना विदर्भ चेंबरचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल यांनी पितृपक्ष संपल्यावर आणि १८ सप्टेंबर रोजी अधिकमासारंभ झाला, त्याच दिवशी एक व्हिडीओ सार्वजनिक केला. त्यात त्यांनी सिंधी कॅम्प, जठारपेठ, उमरी, तारफैल, इनकम टॅक्स चौक, जुने शहर मधील लोक बंद करुन ही त्यात सहभागी होणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यामुळे व्यापार्‍यांचा बंद करु नये अशी भूमिका नितीन खंडेलवाल यांनी घेतली होती. त्याच बरोबर बंद करणे हे सोल्युशन नसल्याचे सांगितले होते. त्याच बरोबर केंद्र व राज्य शासनाने अचानक लॉकडाऊन आणले तर व्यापारी अडचणीत येतील असे म्हणत सोशल डिस्टंस व मास्क लावण्याची अपील केले होते.


असे असताना विदर्भ चेंबरने पत्रक काढून २५ ते २९ सप्टेंबर जनता कर्फ्युचे केलेले आवाहन हे दिशाभूल करणारे व व्यापार्‍यांसह सर्व सामान्य नागरीकांना त्रास देणारे ठरणारे आहे. त्यामुळे नितीन खंडेलवाल यांची १८ सप्टेंबरची भूमिका अचानक चार दिवसात का बदलली असा प्रश्न उपस्थित होतो. यामागे व्यापार्‍यांना नाहक बदनाम करण्याचे षडयंत्र तर नाही ना आणि सामान्य नागरीकांना त्रास तर देण्याचा उद्देश नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. 


जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी खुलासा करावा


नितीन खंडेलवाल यांचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून त्यामुळे नागरीकांच्या व मुख्यतः व्यापार्‍यांच्या मनात शंका निर्माण करत आहे. विदर्भ चेंबरच्या अध्यक्ष असल्याचे सांगत नितीन खंडेलवाल यांनी केलेले हे आवाहन जनतेने मानायचे की २२ सप्टेंबर रोजी काढलेल्या पत्रकाचा स्विकार करायचा याचा खुलासा जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी करावा, श्रीराम सेना या सामाजिक संघटनेने केली आहे.

टिप्पण्या