Public curfew:छोट्या व्यवसायिक व फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ श्रीराम सेनेचा जनता कर्फ्युला विरोध। Shriram Sena opposes public curfew in support of small traders and peddlers

छोट्या व्यवसायिक व फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ श्रीराम सेनेचा जनता कर्फ्युला विरोध

Shriram Sena opposes public curfew in support of small traders and peddlers



अकोला: जिल्हातील छोटे व्यावसायिक, फेरी विक्रेते आणि जे प्रतिष्ठान जनता कर्फ्यु मध्ये आपली दुकाने उघडू इच्छितात, अशा व्यावसायिकांच्या समर्थनार्थ २५ ते २९ सप्टेंबर या कालावधी साठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सने  घोषित केलेल्या जनता कर्फ्यूला श्रीराम सेना विरोध दर्शवित आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष ऍड.पप्पू मोरवाल यांनी दिली.



जनते मध्ये कोरोनाची भीती हळू हळू दूर  होत आहे. आशा काळात आता पाच  दिवस व्यापारी संघटनानी जनता कर्फ्यू घोषित केला तर समाजात परत भीती निर्माण होईल. पहिलेच अनेक छोटे घटक या महामारी मुळे बेरोजगार झाले आहेत. पाच दिवसांचा कालावधीत  काम थांबल्यास  गरीब आणि आर्थिक दुर्बल लोकांना त्रास सहन करावा लागेल,असे मोरवाल यांनी म्हंटले आहे.



श्रीराम सेनेचे दुकानदारांना आवाहन


*हा जनता कर्फ्यू कोणत्याही व्यापाऱ्याला   बंधनकारक नाही.  


*आपण या सार्वजनिक कर्फ्यूमध्ये स्वेच्छेने सहभागी होऊ इच्छित असाल तर ते घ्या. 


*जर तुम्ही जनता कर्फ्यूमध्ये सामील होऊ इच्छित नसेल तर तुम्ही कोणतीही भीती न बाळगता आपली दुकाने / आस्थापने उघडून तुमचे काम करा, 


*जर कोणी जबरदस्तीने आपले दुकान / प्रतिष्ठान बंद करायला आले तर ताबडतोब पोलिस प्रशासनाला कळवा 


*अथवा श्रीराम सेनाच्या पदाधिकारींशी संपर्क साधू शकता 


*गरज पडल्यास श्रीराम सेना मोफत कायदेशीर मदत पुरविल.  


*कोणत्याही प्रकारची सार्वजनिक कर्फ्यूचे आदेश प्रशासनाने जारी केलेले नाहीत हे लक्षात ठेवा.

                       रणजित  सफेलकर

                         राष्ट्रीय अध्यक्ष


टिप्पण्या