OnionExport ban:अकोल्यात कांदा पेटला; पीयूष गोयल यांच्या साठी पाठविली राख, संजय धोत्रे यांच्या दारात 'राख रांगोळी' आंदोलन Onion caught fire in Akola; Ash sent for Piyush Goyal, 'Ash Rangoli' movement at the door of Sanjay Dhotre

अकोल्यात कांदा पेटला; पीयूष गोयल यांच्या साठी पाठविली राख, संजय धोत्रे यांच्या दारात 'राख रांगोळी' आंदोलन

Onion caught fire in Akola;  Ash sent for Piyush Goyal, 'Ash Rangoli' movement at the door of Sanjay Dhotre


केंद्र सरकारच्या निषेधार्थ अकोल्यात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या निवासस्थाना समोर शेतकरी संघटनेच्या वतीने आज राख रांगोळी आंदोलन करण्यात आले.


भारतीय अलंकार

अकोला:  देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ अकोल्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या घरा समोर आज शेतकरी संघटनेने राख रांगोळी आंदोलन केले. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडवे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


या वेळी संजय धोत्रे यांच्या घरासमोर  कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.   संजय धोत्रे यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र अनुप धोत्रे यांनी आंदोलकांनी दिलेले मागणीचे निवेदन स्वीकारले. निवेदना सोबतच  वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासाठी कांद्याची राख देण्यात आली. कांद्यावरील निर्यात बंदी त्वरित उठवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पोलिसांनी यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक  केली. 

आंदोलन ललित बाहाळे, सुरेश जोगळे, विलास ताथोड, धनंजय मिश्रा, निलेश पाटील, लक्ष्मीकांत कौठकर, दिनेश देऊळकार, अरविंद तायडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.


आंदोलनाची पार्श्वभूमी



केंद्र शासनाने  शेतीमाल व्यापार सुधारणा विधेयक मंजुर केले आहे. कांदा आवश्यक वस्तुंच्या यादीतुन वगळला आहे. नविन कायद्यानुसार, शेतकर्‍यांना आपला माल कोठेही विकण्याची मुभा दिलेली आहे. युद्धा सारखी आणिबाणीची परिस्थिती असल्या शिवाय सरकार शेती व्यापारात हस्तक्षेप करणार नाही असा कायदा असताना केंद्र शासनाने १४ सप्टेंबर रोजी अचानक कांद्यावर निर्यातबंदी घालुन स्वतःच कायदेभंग केला आहे,असे शेतकरी संघटनेने म्हंटले आहे.


कांदा हे महाराष्ट्रातील महत्वाचे पीक आहे. गेली सहा महिने कांद्याला अतिशय कमी दर होते. त्यावेळेस सरकारने शेतकर्‍यांना कोणतीही मदत केलेली नाही. आता कुठे परवडतील, असे दर मिळायला लागले असताना सरकारने कांदा निर्यात बंद करुन कांदा उत्पादक शेतकर्‍यांचा विश्वासघात केला आहे. हा निर्णय कांदा उत्पादकांच्या प्रपंचाची राखरांगोळी करणारा आहे. कांदा निर्यातीतुन मिळणारे परकीय चलानामुळे देशाची आर्थिक परिस्थिती सुधारत असताना कांदा निर्यातबंद करण्य‍चा निर्णय आत्मघातकी आहे. 



आज देश आर्थीक संकटात असतांना व देशाला परकीय चलनाची गरज असतांना वाणिज्य मंत्रालयाने परकीय चलन वाढवण्यासाठी प्रयास करावेत की मिळत असलेले परकीय चलन थांबवण्यासाठी? हा प्रश्न या निमित्त उभा ठाकला आहे. शेतकरी संघटना व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने हा प्रश्न  संजय धोत्रे यांनी वाणिज्य मंत्री पर्यंत अवश्य पोहोचवावा. कांद्याची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकऱ्यांची व देशाची आर्थीक कोंडी सोडवण्यास हातभार लावावा, अशी आग्रही मागणी शेतकरी संघटनेने  केली.

 





टिप्पण्या