लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न साठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा-अमोल मिटकरी
*संभाजी बिडीवर त्वरित बंदी आणावी
*देशातील पहिली मुलींची शाळा भिडे वाड्याला आंतरराष्ट्रीय स्मारक घोषित करावे
*अकोला येथे पोलीस आयुक्तालय निर्माण व्हावे
मुंबई: लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, अशी आग्रही मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
आमदार अमोल मिटकरी हे विधानसभा सदस्यांमधून नवनियुक्त झाले असून त्यांचे हे पहिलेच अधिवेशन होते या अधिवेशनात त्यांनी जिल्ह्यातील अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली
आमदार अमोल मिटकरी यांनी पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या संदर्भात विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधले असून, याद्वारे अकोला येथे पोलीस आयुक्तालय निर्माण होणे महत्त्वाचा विषय असून कोविडच्या पार्श्वभूमीवर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.
नाफेड अंतर्गत झालेल्या तूर व हरभरा खरीदी चुकारे लवकर शेतकऱ्यांना मिळावे व अकोला जिल्ह्यातील दुर्गम भागातील व अनेक जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केल्या जावेत,असे मिटकरी यांनी म्हंटले.
तसेच कुटासा येथील 89 हेक्टरवरील बंगाली काट्यांनी वेढलेले जंगल काढून तेथे इको टुरिझम साठी प्रयत्न केला जावा व यासह विविध विषयांवर राज्य सरकारचे लक्ष वेधले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा