- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
" स्त्री चरित्र पुष्प मालिका ''चिंतनमाला
अकोला: विश्वमांगल्य सभा शाखा अकोला तर्फे आयोजित संस्कार, सामर्थ्य, सदाचार, सेवा, धैर्यशीलता या पंचसूत्रीवर आधारित वैविध्यपूर्ण "स्त्री चरित्र पुष्प मालिका'' चिंतनमाला मधील 7 वे व्याख्यान रविवार 27 सप्टेंबर रोजी झाले.
ह्या व्याख्यानास प्रमुख वक्त्या म्हणून अकोल्यातील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ आरती गोडबोले ह्या लाभल्या होत्या. वैद्यकीय व्यवसायासोबतच एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक वर्षी उत्तर पूर्व राज्यांमध्ये जसे अरुणाचल मणिपूर आसाम इत्यादी ठिकाणी काही ठराविक दिवस दुर्गम भागात वैद्यकीय सेवा देत असतात.
विश्व मांगल्य सभेच्या "स्त्री चरित्र पुष्पमालिका" च्या निमित्ताने आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी, राष्ट्रमाता जिजाऊ ह्या कर्तृत्ववान स्त्रियांच्या कार्याची ओळख आहेच, त्यासोबतच भारतभूमीतील ईशान्य भागातील अश्याच एका रणरागिणीची ओळख व्हावी म्हणून त्यांनी पद्मभूषण रानी माँ गाईदिनल्यू यांचे जीवनचरित्र अत्यंत ओघवत्या शैलीत उलगडून दाखवले.
नागालँड सारख्या अत्यंत दुर्गम प्रदेशातील एक मुलगी वयाच्या 13 व्या वर्षी पासून ब्रिटिशांविरुद्ध उभी राहून लढा देते व आपल्या जनजाती लोकांना संघटित करण्याचे कामं करते, ब्रिटिशांनी अटक केल्यावर खुद्द पंडित नेहरू यांनी कारागृहात गाईदिनल्यू यांची भेट घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना रानी माँ ही पदवी बहाल केली होती.
स्वातंत्रानंतर सुद्धा बरेच वर्षांनी सुटका झाल्यावर जनजाती उत्थानाचे, त्यामधील कुप्रथा संपवण्याचे व सर्व जनजातींमध्ये आपली राष्ट्रीयता व सनातन संस्कृती जागृत करण्याचे कामं केले.
भारत सरकार ने त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन रानीमाँ गाईदिनल्यू यांना पद्मभूषण ह्या नागरी सन्मानाने गौरवान्वित केले केले आहे.
अश्या स्पुर्तीनायिकांच्या गुणांना अंगीकारणे आजच्या काळाची गरज आहे असेही प्रतिपादन डॉ आरती गोडबोले यांनी केले.
ह्या व्याख्यानास प्रमुख अतिथि म्हणून पुष्पा वानखडे व प्रमुख उपस्थिति माधवी सदाव्रति ह्या होत्या.
शक्तीगान सुमती कसले ध्वजप्रार्थना आणि जयघोष राधा पंचभाई यांनी म्हटले. सदर व्याख्यानास आभासी पद्धतीने बऱ्याच संख्येने मातृशक्ती, युवा बंधू भगिनीं यांची उपस्थिती होती.
सदर व्याख्यानमाला 2 ऑक्टोबर पर्यंत रोज सायंकाळी 4 ते 5 राहणार असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्व मांगल्य सभा अकोला शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा