- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
देशातील सर्वात मोठया केस मधील अर्जदार केशवानंद भारती यांचे निधन
नवी दिल्ली: केशवानंद भारती हे नाव कायद्याचा अभ्यासकाला पहिल्या वर्षा पासूनच माहीत होते. कारण भारताचे संविधान अभ्यासताना केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार ही केस वाचून समजून घ्यावीच लागते. भारतातील सर्वात मोठी केस अशी देखील या केसची ओळख आहे. केशवानंद भारती विरुद्ध केरळ ,1973 या प्रकरणातील मुख्य अर्जदार (Petitioner) केशवानंद भारती यांचे रविवारी सकाळी त्यांच्या 'इडनीर' या मठात निधन झाले.
केशवानंद भारती विरुद्ध केरळ (1973) ही केस भारताच्या न्यायालयीन इतिहासातील सर्वात मोठी व सर्वात महत्त्वाची केस आहे. या केसने भारतात फक्त आणि फक्त भारतीय संविधानच सर्वोच्च राहील, संविधानापुढे देशात कोणीच मोठे नाही. तसेच भारतीय संविधानाच्या मूळ चौकटीत बदल करता येणार नाही असं ठरले.
या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात तब्बल ६८ दिवस चालली.यात एकूण तेरा न्यायाधीश होते. त्यातही दोन गट पडले होते. शेवटी या प्रकरणात केशवानंद भारती यांच्या बाजूनेच निकाल लागला व देशात भारतीय संविधानाच सर्वोच्च राहील, असा निर्णय झाला. यात अजून एक महत्त्वाचं व मुख्य नाव म्हणजे सदरील प्रकरण चालवणारे वकील नानीभाई पालखीवाला होते. देशात तेव्हा इंदिरा गांधी यांचं सरकार होते. तर हा वाद केशवानंद भारती व तत्कालीन सत्ताधारी पक्षात होता. या प्रकरणाला भारताच्या न्यायालयीन इतिहासात अनन्य साधारण महत्व आहे.आजही या प्रकरणाचे संदर्भ दिले जातात.अशी ही महत्त्वाची केस आहे.
या केसवर मोठमोठी पुस्तके उपलब्ध आहेत.देशात फक्त आणि फक्त भारतीय संविधानाचच राज्य रहावे, अशी इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनी ही केस वाचली पाहिजे.केवळ पारंपरिक पद्धतीने संविधानाचा अभ्यास न करता व विविध ऐतिहासिक प्रकरणातूनही आपले सर्वांग सुंदर भारतीय संविधान समजून घेतले पाहिजे.अशी ही ऐतिहासिक केस (प्रकरण) आहे. यातील मुख्य Petitioner केशवानंद भारती यांचे आज निधन झाले आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!!!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा