Katepurna river:देव तारी त्याला कोण मारी...काटेपूर्णा नदीपात्रात वाहुन जाणारे दोघेही बापलेक सुखरुप

देव तारी त्याला कोण मारी...
काटेपूर्णा नदीपात्रात वाहुन जाणारे दोघेही बापलेक सुखरुप


               Both are safe 

 

अकोला: पिंजर ते बार्शीटाकळी रोडवरील दोनद नजिकच्या पुलावरुन काटेपुर्णानदी पात्रात कारंजा येथील आपल्या तीन वर्षाच्या मुलासह वडीलांचा काटेपुर्णा नदीपात्रात तोल जाऊन ते नदीत कोसळले होते.या घटनेतून दोघेही सुखरूप बचावले.

नदित कोसळल्यानंतर पाण्याच्या प्रवाहात वाहत जाऊ लागले. एवढयातच पुलापासुन 500 मी.अंतरावर वाहत गेल्यावर नदीच्या काठी झाडाला पकडत पकडत एका ठीकाणी  मुलाला घेऊन थांबले.


लगेच *दोनद येथील भारत ढीसाळे, शिवम अनारसे,युवराज सुर्वे, गणेश नारायण नागे, वैभव मनोहर प्रधान, भिकाजी उजवणे, संतोष कदम या नागरिकांनी नदीत उड्या मारून त्या दोघांही बापलेकांना सुखरुप बाहेर आणले.


यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेंद्र  ठाकरे, बिट जमादार सोळंके हे घटनास्थळी पोहचले होते. 


कारंजा येथुन पती पत्नी आपल्या दोन वर्षाच्या मुलासह दुचाकीने अकोला येथे जात असतांना एवढ्यातच दोनद जवळील पुलावर  काटेपुर्णा धरणाचे पाणी सोडल्याने नदी दुथडीभरुन वाहत आहे, हे पाहण्या साठी थांबले. यावेळी मुलाला आपल्या पोटाशी दुप्पट्याने बांधून असलेल्या परीस्थिती पाणी पाहत असतांना नदीत  तोल गेला. दोघेही बापलेक वाहु लागले.


यावेळी उपस्थित नागरिकांनी आणि आईने आरडाओरडा केला. तेव्हा लगेच दोनद येथील  नागरीक धावून आले. आणी नदीपात्रात उड्या घेऊन झाडाला पकडुन असलेल्या दोघांही बाप लेकांना सुखरुप बाहेर आणले. लगेच ठाणेदार शैलेंद्र ठाकरे  यांनी आपल्या वाहनात घेऊन पिंजर येथे आणले. तेथे प्राथमिक उपचार करुन यावेळी दोघेही सुखरुप असल्याचे सांगितले. येथुन लगेच नातेवाईकांनी आई सह दोघा बापलेकांना कारंजा येथे घेऊन गेले. या घटनेमुळे आज 'देव तारी त्याला कोण मारी' याचा प्रत्यय आला. 

दोनद येथील सागर कावरे यांच्या कार्यतत्परतेला सलाम


या घटनेची माहिती दोनद येथील सागर कावरे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती दिली होती. लगेच या घटनेची माहिती जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार शैलेंद्र  ठाकरे यांना दिली. लगेच दीपक सदाफळे यांनी आपली  रेस्क्यु टीम आणि बचाव साहित्य घेऊन पिंजर बाहेर निघताच, पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना ठाणेदार ठाकरे यांचा फोन आला.  दोघेही जिवंत आणि सुखरुप बाहेर काढले, अशी माहिती दिली. आंम्ही घटनास्थळी पोहोचायच्या अगोदरच तो पर्यंत बाहेर काढण्यात आले, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.


यावेळी जि.प.सदस्य पुत्र विशाल गावंडे यांनी बाप लेकाला सुखरूप वाहत्या पाण्यातून वाचविणा-या युवकांना पाच हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन त्यांचे कौतुक केले.

टिप्पण्या