Kapasi-soyabin:हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ

हमीभाव जाहीर : कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७० रुपये वाढ

अकोला : केंद्र सरकारने खरीप २०२०-२१करिताचे हमीभाव आज (ता.१) जाहीर केले आहेत. यात कपाशीत २६०, सोयाबीनमध्ये १७०, भातात ५३, तूरीत २००, मूगात १४६ तर उडीदात ३०० रुपये गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ केली आहे. 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थित झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज  निर्णय घेण्यात आला. 



केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी बैठकीनंतर हमीभावाच्या निर्णयाची माहिती दिली. कृषिमंत्री तोमर म्हणाले,‘‘केंद्रीय कृषिमूल्य आयोगाच्या शिफारसींनुसार केंद्र सरकारने देशातील १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्य वाढविण्यास मंजूरी दिली आहे.’’



एमएसपी २०२०-२१ (प्रतिक्विंटल/रूपयात) 
(कंसात गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ)
भात/धान : १८६८ ( ५३)
भात/धान (ए ग्रेड) : १८८८ ( ५३)
ज्वारी : २६२० ( ७०)
ज्वारी मालदांडी : २६४० ( ७०)
बाजरी : २१५० ( १५०)
नाचणी : ३२९५ ( १४५)
मका : १८५० ( ९०)
तूर : ६००० ( २००)
मूग : ७१९६ ( १४६)
उडीद : ६००० ( ३००) 
भूईमुग : ५२७५ ( १८५) 
सूर्यफूल : ५८८५ ( २३५) 
सोयाबीन : ३८८० ( १७०) 
तीळ : ६८५५ ( ३७०) 
खुरासणी : ६६९५ ( ७५५) 
कपाशी (मध्यम धागा) : ५५१५ ( २६०)कपाशी लांब धागा : ५८२५ ( २७५)




‘‘ ही वाढ केंद्र सरकारने केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव व दुप्पट उत्पन्न करून देण्याचे अभिवचन दिले त्या दृष्टीने केंद्र सरकारची वाटचाल सुरू आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे शेतकरी नेते व पश्‍चिम विदर्भातील शेतकऱ्यांच्या भावना जाणून त्यासाठी संघर्षशील असणारे केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय  धोत्रे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे.


शेतकरी संकटात असताना त्याला आधार देऊन covid-19 मध्ये केलेल्या कामाचा वेगवेगळ्या माध्यमातून आधार देण्याचं काम केंद्र सरकार करीत असून, सरकारच्या या निर्णयाचे अकोला जिल्हा भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे ,आमदार हरीश पिंपळे, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात ,श्रीकृष्ण मोरखडे, रामदास लांडे, केशव ताथोड, माधव मानकर ,डॉक्टर विनोद बोर्डे ,किशोर पाटील ,संजय जिरापुरे, संजय गोडा ,अक्षय गंगाखेडकर , रमेश  कोपरे, केशव ताथोड ,माया कावरे, चंदा शर्मा, कुसुम भगत, सचिन देशमुख शिवाजीराव देशमुख ,बाळासाहेब आपोतीकर, डॉक्टर शंकरराव वाकोडे नयना मनतकर आदींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या