IPL2020: बहुप्रतिक्षित IPL2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर

बहुप्रतिक्षित IPL2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर

                                        IPL2020

सहा वर्षानंतर UAE मध्ये होत आहे IPL


नवी दिल्ली: आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने रविवारी युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग 2020 चे वेळापत्रक जाहीर केले. यंदा IPL चा 13 व हंगाम UAE मध्ये रंगणार आहे. मात्र,यापूर्वी देखील IPL UAE मध्ये पार पडली आहे. 2014 मध्ये भारतात लोकसभा निवडणूक असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्पर्धा UAE मध्ये घेण्यात आली होती. तर यावेळी भारतावर कोरोना  विषाणूचे सावट  असल्याने स्पर्धा UAE मध्ये होत आहे.यावर्षी 29 मार्च ते 24 मे या कालावधीत स्पर्धा खेळली जाणार होती.मात्र,Lockdown मुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती.



19 सप्टेंबर रोजी अबू धाबी येथे गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होवून हा ब्लॉकबस्टर हंगाम सुरू होईल.


शनिवारी टूर्नामेंट सुरू झाल्यावर रविवारी  दिल्ली कॅपिटल्स व किंग्ज इलेव्हन पंजाब संघात सामना होईल. दुबई मधील हा पहिला सामना असेल. त्यानंतर सोमवारी तिसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे.

शारजाह येथे मंगळवार 22 सप्टेंबर ला राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्ज सामन्याचे आयोजन होईल.


पहिला सामना 3:30 pm IST आणि दुपारी 2 वाजता यूएई वेळे नुसार सुरू होईल. तेथे 10 डबल हेडर्स असतील.  सर्व संध्याकाळच्या सामन्यांना सायंकाळी साडेसात वाजता आणि यूएईच्या वेळेत 6 वाजता प्रारंभ होईल.  एकूण 24 सामने दुबई, 20 अबुधाबी आणि 12 शारजाह येथे होतील.

प्लेऑफ आणि आयपीएल 2020 च्या अंतिम सामन्यांची यादी नंतर जाहीर केली जाईल,असे BCCI ने सांगितले आहे.






टिप्पण्या