Health care:"सर्वोपचार रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने गेला मामाचा जीव"- भाचीने पत्रकार परिषदेत केला गंभीर आरोप

"सर्वोपचार रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने  गेला मामाचा जीव"- भाचीने पत्रकार परिषदेत  केला गंभीर आरोप 



अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात कोविड19 च्या रुग्णांबाबत गंभीर स्वरूपाचे निष्काळजी पणा होत आहे. डॉक्टरच्या आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे. 


सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्ण नसतांनाही पॉझिटिव्ह रुग्ण म्हणून दाखल करणे, रुग्णाचा तपासणी अहवाल यायच्या अगोदरच रुग्णाला कोविड रुग्ण म्हणून  दुय्यम  वागणूक देणे, रुग्णाला वाचवण्यासाठी ऑक्सिजनची गरज असतांनाही रुग्णांबाबत नातेवाईक यांना माहिती दिली जात नसल्याने रुग्णांना जाणीवपूर्वक यमसदनी पाठवले जात आहे. असे अनेक गंभीर आरोप मृतक किशोर तुळशीराम शिंदे यांची भाची शिवानी किटे व नातेवाईकांनी केला आहे. 


सर्वोपचार रुग्णालयाच्या ढिसाळ व मनमानी कारभाराची कसून चौकशी होणे गरजेचे आहे. याकरिता आज 17 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषदचे आयोजन  करण्यात आले होते. 


सर्वोपचार रुग्णालयात कोविड रुग्ण भरती झाल्यावर सर्वोपचार प्रशासन त्या रुग्णासोबतचे नातेसंबंध तोडून टाकते.  मात्र,  त्या रुग्णाची योग्य काळजी तर सोडाच साधी मानवतेच्या दृष्टिकोनातून  सुध्दा काळजी घेतली जात नाही आणि नातेवाईक यांनाही काळजी घेऊ दिली जात नाही. तसेच रुग्णांबाबत नातेवाईकांनी चौकशी केली तर कर्तव्यवरील वैद्यकीय अधिकारी किंवा  कर्मचारी चांगलेपणाने बोलत नाहीत. यावर कळस म्हणजे वरिष्ठ अधिकारी सुध्दा रुग्णांचे नातेवाईक यांचे समाधान करण्याऐवजी त्यांच्यासोबत उद्धट बोलून  त्यांचेही मानसिक खच्चीकरण करतात.  हे करत असतांनाच  रुग्णाची योग्य देखभाल केली असती तर  येथील अधिकारी आणि कर्मचारी यांचा बरताव सहन केला असता मात्र, तसेही होत नाही. कोविड व्यतिरिक्त इतर आजारांचे रुग्णांनाही चांगली वागणूक दिली जात नाही.

एक रुग्ण बेड वरून खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार कालच उघड झाला. याबाबतची माहिती त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी पत्रकार परिषदेत उपस्थिती लावून सांगितली.  


यासारखेच इतर गंभीर प्रकार सर्वोपचार रुग्णालयात होत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आहे. हा प्रकार गंभीर असून त्या अधिकाऱ्यांवर खुनाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणी मृतक रुग्णाच्या नातेवाईकांनी आज पत्रकार परिषदेत केली. यावेळी वृषाली फाले, शिवानी किटे, शुभम शिंदे व आर पी आय  युवा  अध्यक्ष बुध्दभूषण गोपणारायण आदींची उपस्थिती होती.


आर पी आय तीव्र आंदोलन करणार

सर्वोपचार रुग्णालयात अनेक गंभीर प्रकार होत असून, याकडे सर्वोपचार रुग्णालयाचे मुख्य अधिष्ठाता आणि प्रशासन  गंभीर नसल्यानेच असे प्रकार घडत आहेत हे प्रकार थांबविण्यासाठी रिपाई (आठवले गट)युवक आघाडी  लवकरच तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा बुध्दभूषण गोपणारायन यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

टिप्पण्या