government garden:सरकारी बगीचाच्या सौंदर्यीकरणाला आमदार शर्मा यांनी आतापर्यंत एक कोटी रुपये केले खर्च !

    सरकारी बगिचा नामकरण वाद

सरकारी बगीचाच्या सौंदर्यीकरणाला आमदार शर्मा यांनी आतापर्यंत एक कोटी रुपये केले खर्च !

MLA Sharma has so far spent Rs 1 crore on beautification of government gardens!




अकोला: शहराच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे अकोला पश्चिमचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी शहरातील शिवाजी पार्क, महाराणा प्रताप पार्कचे सौंदर्यीकरण केल्यानंतर सरकारी बगीचाच्या  सौंदर्यीकरण करण्याला एक कोटी रुपये आतापर्यंत खर्च केले आहे. मात्र,काही राजकारणी प्रसिद्धीसाठी उद्यान विकासाचे श्रेय स्वतः लाटून घेत आहेत,असा टोला आमदार गोवर्धन शर्मा यांनी शिवसेना आमदार गोपिकीसन बाजोरिया यांचा नामोल्लेख न करता  मारला.


शिवसेनेने आज अकोल्यातील जुना असलेला सरकारी बगीच्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा फलक लावून बगीच्याचे नामकरण कार्यक्रम झटपट मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पाडून घेतला. यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार गोवर्धन शर्मा यांनी प्रसार माध्यमाकडे प्रतिक्रिया दिली.


आमदार शर्मा हे शहराच्या नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे तसेच शहराचे वैभव कायम राहावे, यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असल्याने सरकारी बगीच्याचे काम प्रगतिपथावर आहे. अकोला शहराचे लाडके आमदार गोवर्धन शर्मा यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विशेष निधी आणला. शहरातील रस्त्यांचे सोबत उद्यानांसाठी देखील निधी उपलब्ध करून घेतला. सरकारी बगीचाच्या विस्तारीकरणाला सोबत सकाळी आपले आरोग्य नीट राहावे, यासाठी बगिच्यात फिरणार्‍यासाठी वॉकिंग पथ निर्माण केले. वृक्षारोपण करून  भव्यता निर्माण साठी वेगवेगळ्या प्रकारच्या निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे ओसाड पडलेल्या सरकारी बगीचा मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.


परंतू, केवळ गप्पांचा बाजार करणारे काही राजकारणी कामाचा श्रेय घेण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, जनतेला आणि सरकारी कागदपत्रावर ही संपूर्ण माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे त्यांचा (शिवसेना) क्षणिक प्रसिद्धीचा डाव यशस्वी होत असला तरी, आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नाने सरकारी बगिच्याचा कायापालट होत आहे. शहरातील अजून बाकीच्या बगीचांसाठी सुद्धा निधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा प्रयत्नशील आहेत,असे भाजपाने प्रसार माध्यमांना सांगितले.


हे सुद्धा वाचासरकारी बगिच्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव

टिप्पण्या