Ganesh festival2020:आशिष पवित्रकार यांच्या पुढाकाराने गणपती विसर्जन सोहळा सुरक्षित आणि उत्साहात

आशिष पवित्रकार यांच्या पुढाकाराने गणपती विसर्जन सोहळा सुरक्षित आणि उत्साहात 

अकोला: अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणारा गणपती विसर्जन सोहळ्यावर कोरोनाचे सावट होते. त्यामुळे नागरिकांची ही अडचण लक्षात घेऊन आणि सुरक्षित आणि इकोफ्रेंडली विसर्जनासाठी  प्रभाग 13 चे नगरसेवक यांनी पुढाकार घेऊन प्रभागातील छत्रपती संभाजी महाराज पार्क मध्ये व्यवस्था केली. आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहात तेथे सहभाग घेतला आणि आपल्या लाडक्या बाप्पाला संमिश्र भावनांनी निरोप दिला.


विसर्जन व्यवस्था कार्यक्रमाचे उदघाटन माजी पालकमंत्री डॉ रणजित पाटील  यांच्या हस्ते आणि आमदार गोवर्धन शर्मा (लालाजी) तसेच नगरसेवक हरिशभाई आलीमचदानी डॉ अशोक ओलम्बे  प्रशान्त अवचार यांच्या उपस्थितीत झाले.


दिवसभर सुरू असलेल्या विसर्जन स्थळाची उत्कृष्ट व्यवस्था संपूर्ण शहरात चर्चेचा विषय झाली होती तेथे महानगरपालिका उपायुक्त वैभव आवारे  तसेच क्षेत्रीय अधिकारी जाधव यांनी आवर्जून भेट दिली. आरोग्य निरीक्षक धनराज बचेरवाल,निखिल कपले यानचे सहकार्य लाभले.
संपूर्ण दिवसभरात पवित्रकार यांचे महानगरपालिका तसेच पक्षातील अनेक सहकारी प्रतिष्ठित नागरिक यांनी देखील विसर्जन स्थळी भेट दिली.

संपूर्ण पार्क मध्ये आरती साठी स्वतंत्र टेबल ताज्या पाण्याची व्यवस्था आणि वाजतगाजत विसर्जनासाठी वाद्यवृंद तसेच तापमान तपासणी पासून सॅनेटायझर पर्यंत आणि सोशल डिस्टनसिंगचे सर्व नियम पाळून व्यवस्था करण्यात आली होती.



प्रभागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि कोरोना च्या पार्श्वभूमीवर सगळ्यांच्या आरोग्याचा विचार करून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ही व्यवस्था केली होती जेणेकरून आपल्या लाडक्या बाप्पाला आपण दरवर्षी प्रमाणे निरोप देऊ शकू असे यावेळी आशिष पवित्रकार यांनी सांगितले तसेच नागरिकांनी ही सर्व नियम पाळून कार्यक्रम व्यवस्थित पार पाडल्याबद्दल आभार मानले.


More images


टिप्पण्या