Ganesh festival2020:केवळ मतांसाठी भगवा शेला आणि टोपी घालून चालणार नाही-आमदार सावरकर

केवळ मतांसाठी भगवा शेला आणि टोपी घालून चालणार नाही-आमदार सावरकर

अकोला: भक्ती, श्रद्धा, संस्कार, परंपरा ही रक्तामध्ये व पिढीजात असणे गरजेचे असून, हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येकाच्या कल्याणाची भावना रुजली आहे. समाजहित राष्ट्रहित परिवार तसेच प्राणिमात्रांची  कल्याणाची संकल्पना हिंदू संस्कृती मध्ये आहे. या संस्कृतीमध्ये गणरायाला प्रथम वंदन करून प्रत्येक कार्याची शुभारंभ करण्यात येते. गणरायाच्या जीवनापासून प्रेरणा घेऊन प्रत्येकाने कार्य करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी केले.
"केवळ मतांसाठी भगवा शेला घालून टोपी घालून चालणार नाही. यासाठी या संस्कृतीशी एकरूप होणे गरजेचे आहे. भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटना हे केवळ प्रत्येक कार्य समाज हितासाठी करीत असते, असे सांगून गणराया सगळ्यांचा कल्याण करो", अशी प्रार्थना भाजपातर्फे आमदार रणधीर सावरकर यांनी केली.




भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात एकवीस वर्षापासून सातत्याने गणपतीची स्थापना करून विविध कार्यक्रम होत असतात. आज परंपरेनुसार जिल्हाध्यक्ष आमदार रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तेजराव थोरात, जिल्हा प्रवक्ता गिरीश जोशी, कार्यालय मंत्री नाना कुलकर्णी,  माधव मानकर, जयंत मसने, मनीराम टाले यांच्या हस्ते पूजा अर्चना होऊन गणेश घाटावर विसर्जन करण्यात आले.यावेळी चंदा शर्मा, अमरसिंह भोसले रतना गिरी, भूषण बाजारे, विनोद पोपल ,मंगेश सावग आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 
गणेश  घाट सह तापडिया नगर, अकोट फैल, शिवाजी नगर, रेणुका नगर ,कौलखैड ,हिंगणा फाटा, हरिहर पेठ या भागाची पाहणी व गणेश भक्तांची भेट आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने, स्थायी समिती सभापती सतीश ढगे, राजेंद्र गिरी, डॉक्टर विनोद बोर्डे, संजय जिरापुरे, संजय गोडा ,अक्षय गंगाखेडकर आदींनी केली.





Ganesh Visarjan'20

टिप्पण्या