Ganesh festival2020:आज बाप्पाला निरोप ;गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी गणेश मुर्तीचे विसर्जन करावे

गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी गणेश मुर्तीचे विसर्जन करावे-जितेंद्र पापळकर


अकोला:  कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यावर्षीचा गणेशउत्सव अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करावयाचा असून गणेश मंडळानी सुर्यास्तपूर्वी गणेश मुर्तीचे विसर्जन करावे. तसेच नागरिकांनी शक्यतोवर घरच्याघरीच मुर्तीचे विसर्जन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.


गणेश विसर्जन आयोजनाचा आढावा जिल्हाधिकारी यांच्या दालनात घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, मनपाचे शहर अभियंता अजय गुजर, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांची उपस्थिती होती.



कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गणेश घाटावर मुर्ती विसर्जनासाठी आणतांना घरीच पुजा करावी. तसेच मातीच्या मुर्ती असल्यास त्याचे घरच्या घरीच विसर्जन करावे. लहान मुले व वृध्दांनी गणेश विसर्जनासाठी येवू नये. गणेश मुर्ती सोबत एक किवा दोघांनी यावे. कोणत्याही प्रकारची मिरवणूक काढता येणार नाही. विसर्जनाला जातांना घराजवळच्या गणेश घाटावर किंवा सर्वात जवळच्या मार्गानी विसर्जनाला जावे. कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवू नये, अशा सूचना त्यांनी दिल्यात.

मनपाच्यावतीने तात्पूरत्या गणेश घाटाची व्यवस्था

मनपाच्या वतीने पाच ठिकाणी तात्पुरत्या गणेश घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे.  सिटी कोतवाली जवळ, हरिहर पेठ, निमवाडी गणेश घाट, लक्झरी बस स्टँडच्या मागे, कौलखेड हिंगणा रोड या ठिकाणी विसर्जनाकरीता व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभागात मुर्ती विर्सजनाकरीता गणेशघाटाची व्यवस्था करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त दक्षिण झोनमध्ये जूने खेतान नगर, कौलखेड, ग्रामपंचायत जवळ मलकापूर व खडकी येथे अतिरिक्त गणेश घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे.



गणेश विसर्जनाकरीता नागरिकांनी घ्यावयाची काळजी

 

श्रीच्या विसर्जनाच्यावेळी मिरवणूक काढण्यात येवू नये. तसेच विसर्जनाच्या पारपांरिक पध्दतीत विसर्जन ठिकाणी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीतकमी वेळ थांबावे व लहान मुले व वरिष्ठ नागरिकांनी विसर्जन स्थळी जाणे टाळावे. नागरिकांनी तसेच गणेश मंडळानी सामाजिक अंतर राखून तसेच कोणताही प्रकारची गर्दी न करता गणेश मुर्ती विसर्जन करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा व मनपा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टिप्पण्या