flood dnyanganga:ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या त्या युवकाचा अखेर सापडला मृतदेह... The body of the youth who was swept away in the flood of Dnyanganga river was finally found ...

ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेलेल्या त्या युवकाचा अखेर सापडला मृतदेह...



The body of the youth who was swept away in the flood of Dnyanganga river was finally found ...


जिवरक्षक दीपक सदाफळे यांनी तीन की.मी.औदा बु.पर्यंत पोहत वायर रोपच्या साहाय्याने ओढत आणला नदीच्या पुरातुन मृतदेह  


घटनास्थळ: निमगाव ता.नांदुरा जिल्हा बुलडाणा: ज्ञानगंगा नदी



बुलडाणा: शेतातून जात असताना अचानक पुराचा जोरदार प्रवाह आल्याने रामपूर येथील २३ वर्षीय युवक वाहून गेला होता. दोन दिवसानंतर त्याचा शोध लागला.शोध मोहिमेत त्याचा मृतदेह सापडला. मृतकाचे नाव निखिल रवी चावरे असे आहे.



२१ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास निखील रवी चावरे ( रा.रामपुर ता.नांदुरा जिल्हा बुलढाणा) शेतातुन जात असतांना ज्ञानगंगा नदीच्या पुरात वाहून गेल्याची माहिती नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांनी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. आणी लगेच सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. पथक प्रमुख दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी अजय डाके, मयुर सळेदार, चेतन इंगळे, शुभम सुरेश वानखडे, ऋतीक सदाफळे, गोविंदा ढोके हे रेस्क्युबोट व शोध बचाव साहित्यासह २२ सप्टेंबर रोजी घटनास्थळी पोहचले.


तहसीलदार राहुल तायडे साहेब यांच्या मार्गदर्शनात जिवरक्षक दीपक सदाफळे यांच्या नेतृत्वात सर्च ऑपरेशन चालु केले. रात्री उशिरापर्यंत पर्यंत शोध घेतला. परंतु निखील चावरे आढळला नाही. पुन्हा आज सकाळी सर्च ऑपरेशन चालु केले असता औदा शिवारात ज्ञानगंगा नदीच्या पात्रात घटनास्थळा पासुन पाच की.मी.अंतरावर सकाळी ९.४५ ला निखीलचा मृतदेह फुगलेल्या आणि दुर्गंधी अवस्थेत सापडला. 



परंतु धारेचा प्रवाह आणी मृतदेह बाहेर काढण्यासाठी ३ की.मी औदा पुला पर्यंत जागाच नसल्याने दीपक सदाफळे यांनी चक्क पोहत पोहत वायर रोपच्या साहाय्याने लाईफ रींग घेऊन औदा गावातील पुला पर्यंत ओढत आणला. सोबत कव्हरिंग देण्यासाठी मयुर सळेदार याची मदत घेतली.



यावेळी तहसीलदार राहुल तायडे ,प.वि. तहसीलदार समाधान सोनोने ,नायब तहसीलदार संजय मार्कंड ,मंडळ अधिकारी अनिल जोशी, तलाठी इंगळे ,तलाठी क्षीरसागर,तलाठीअमोल उगले  यावेळी हजर होते. घटनास्थळी नांदुरा पोलीस कर्मचारी यांनी पुढील कार्यवाही चालु केली, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे. 



टिप्पण्या