Dadarao Mate:दादाराव मते यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची हानी-संजय धोत्रे

दादाराव मते यांच्या निधनाने राजकीय व सामाजिक क्षेत्राची हानी-संजय धोत्रे

      भाजपा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

अकोला: उत्कृष्ट समाजसेवक, मनमिळावू राजकारणी, शेतकऱ्यांच्या विषयी जाण असणारा व राजकीय क्षेत्रामध्ये सर्वांशी व्यक्तिगत संबंध जोपासून विचाराशी एकरुप राहणारे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दादाराव मते पाटील यांच्या निधनाने राजकीय सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री नामदार संजय भाऊ धोत्रे यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



वऱ्हाडी भाषेवर प्रभुत्व-आमदार सावरकर
ग्रामीण भागाशी नाळ जुळलेले वहाडी भाषेवर प्रभुत्व असणारे, जनतेच्या सुख दुःखात सहभागी होणारे, काँग्रेसशी एकनिष्ठ असलेले नेते दादाराव मते पाटील यांच्या निधनाने जिल्ह्यातील सहकार शेतकरी चळवळची मोठी आणि झाली, अशा शब्दात जिल्हा भाजपा अध्यक्ष आमदार रणधिर  सावरकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.


राजकीय पटलावर पोकळी निर्माण झाली- गोवर्धन शर्मा

धार्मिक ,सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये सदैव अग्रेसर राहणारे लोकनेते सतत हसतमुख असणारे दादाराव मते पाटील यांच्या निधनाने राजकीय पटलावर मोठी पोकळी निर्माण झाली, अशा शब्दात आमदार गोवर्धन शर्मा यांनी आपली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



महापौर अर्चना मसने, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, तेजराव थोरात, डॉक्टर किशोर मालोकार, डॉक्टर विनोद बोर्डे,  गितांजली शेगोकार आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

टिप्पण्या