crop insurance :रखडलेली पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आमदार सावरकार यांच्या पाठपुरावामुळे झाले शक्य। Deposited crop insurance amount credited to farmers' account; MLA Savarkar's pursuit made it possible

रखडलेली पीक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; आमदार सावरकार यांच्या पाठपुरावामुळे झाले शक्य

Deposited crop insurance amount credited to farmers' account;  MLA Savarkar's pursuit made it possible



अकोला: पळसो बढे, रामगाव, कौलखेड जाहागीर,रामगाव, महादलपुर सह पंचवीस शिवार गावातील ६६५  शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप २०१९ च्या रखडलेल्या पिक विम्यापोटी एक कोटी ६ लाख ४२ हजार ९४३ रुपये ४५ पैसे त्यांच्या बँक खात्या मध्ये प्रत्यक्ष जमा झाले असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. 



पंतप्रधान पिक विमा योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र बँक पळसो शाखेकडून पैसे न भरल्या मुळे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे रक्कम मिळाली नव्हती. या संदर्भात आमदार सावरकर चार महिन्यांपासून सातत्याने संघर्ष करीत होते. मात्र,प्रशासन सकारात्मक प्रतिसाद देत नव्हते. अखेर सावरकर यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. तसेच केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी याविषयी लक्ष घातले. आमदार सावरकर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे आज अखेर २५ गावातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमाची रखडलेली रक्कम जमा झाली आहे.



२३ ऑक्टोंबर रोजी अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. 

त्या दिवसापासून आज अकरा महिन्या पर्यंत पीकविमाची रकम अडकली होती.  कोरोनाच्या या संकट काळात रखडलेली रक्कम मिळाली असल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.


 

टिप्पण्या