covid19impact: प्रत्येक तालुक्यात ५० जादा बेडची सुविधा निर्माण करा- बच्चू कडू Create 50 extra beds in each taluka - Bachchu Kadu

प्रत्येक तालुक्यात ५० जादा बेडची सुविधा निर्माण करा- बच्चू कडू

Create 50 extra beds in each taluka - Bachchu Kadu


अकोला: जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ५० बेडसची तसेच महापालिका क्षेत्रात शंभर बेडची ज्यादा सुविधा निर्माण करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.


जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू हे सध्या स्वतः कोरोना बाधित असून ते गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. असे असतानाही त्यांनी जिल्हा प्रशासनातील सर्व व प्रमुख अधिकाऱ्यांची आज मोबाईल कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. 



यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मनपा आयुक्त संजय कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 



यावेळी पालकमंत्री ना.कडू यांनी निर्देश दिले की , जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता रुग्णांच्या उपचाराची व्यवस्था करणे अत्यावश्यक असून त्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या यंत्रणेमार्फत ज्यादा पन्नास बेडची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. 


अकोला महानगरपालिका क्षेत्रात अकोला महानगरपालिके तर्फे १०० बेडची जादा सुविधा उपलब्ध करण्यात यावी. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील  अतिदक्षता विभागातील बेडची संख्या ही वाढवण्यात यावी, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.


तसेच जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत उपचार सुविधांमध्ये कमतरता भासू न देण्याची खबरदारी सर्व यंत्रणांनी घ्यावी. जिल्ह्यात मास्कचा वापर करणे सामाजिक अंतर राखणे तसेच अन्य प्रतिबंधात्मक उपायांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, असेही निर्देश ना. कडू यांनी दिले.

टिप्पण्या