covid19impact:विदर्भ चेंबरच्या घोषित जनता 'कर्फ्यु' संदर्भात अकोलेकर 'कन्फ्युज' Akolekar 'confused' over Vidarbha Chamber's declared public 'curfew'

विदर्भ चेंबरच्या घोषित जनता 'कर्फ्यु' संदर्भात अकोलेकर 'कन्फ्युज' 

Akolekar 'confused' over Vidarbha Chamber's declared public 'curfew'



*विदर्भ चेंबरच्या जनता संचारबंदीला प्रशासनाचे पूर्ण समर्थन पण अद्याप आदेश जारी केला नाही



*सामान्य जनता व किरकोळ विक्रेते संभ्रमात

*संचारबंदीत सहभागी होण्यासाठी सक्ती नाही


*पालकमंत्री यांना सुध्दा दिली नव्हती परवानगी



*अकोला जिल्ह्यात २५ ते २९ सप्टेंबर पर्यंत जनता संचारबंदी : सर्व व्यापारी संघटनाचे एकमत


भारतीय अलंकार

अकोला: अकोला जिल्ह्यात कोरोना रोगाच्या संसर्गाची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. ही साखळी तोडण्यासाठी विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स व अन्य व्यापारी संघटनांनी एकमत करून पाच दिवसांची जनता संचारबंदी जिल्ह्यात करण्यात येत असून, यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सहकार्य लाभले आहे, असे मंगळवारी घोषित केले. मात्र, या घोषणा नंतर सामान्य जनता,किरकोळ व्यापारी, फेरीवाले आदी संभ्रमात पडले आहे.


काय केल्या घोषणा प्रसिद्धी पत्रकात


*अकोल्यात दररोज १०० हून अधिक रूग्णांची ओळख होत असून, वैद्यकीय पायाभूत सुविधांवर प्रचंड दबाव आहे. या आजाराची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. या परिस्थितीला गांभीर्याने घेता विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अकोला मागील काही दिवसांपासून जन प्रतिनिधी, अकोला जिल्हा प्रशासन, अकोला महानगर पालिका, पोलीस विभाग, जिल्ह्यातील सर्व व्यापारी आणि उद्योग संघटनांसोबत निरंतर संपर्क साधून विस्तृत चर्चा करत होते.


*आज २२ सप्टेंबर रोजी, चेंबर ने सर्व संघटनांची ऑनलाईन सभा बोलावली होती ज्याच्यात ५० पेक्षा जास्त संघटनांचे १०० च्या वर पदाधिकारी उपस्थित होते. अकोला सर्व उपस्थितांनी एक मताने आणि स्वयंस्फूर्तनि जनता कर्फ्यु लागू करण्याचे मत आणि अभिप्राय व्यक्त केले. अकोला जन प्रतिनिधींशी संपर्क साधून चेंबरचे पदधिकाऱ्यानी या भावनेला त्यांचे आशीर्वाद आणि संमती घेतली. तसेच, अकोला जिल्हा प्रशासन, महानगर पालिका आणि पोलीस विभागासोबत संयुक्त बैठकीत त्यांचे पूर्ण समर्थन ही चेम्बरला भेटले.



*सर्व संमतीने सामान्य नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनाला प्रस्तुत झालेला धोका लक्षात घेता, संपूर्ण अकोला जिल्ह्यात शुक्रवार २४ सप्टेंबर ते मंगळवार २९ सप्टेंबर पर्यंत पाच दिवसांचा जनता कर्फ्यु  लागू करण्याचे सर्व व्यापारी संगठनांनी एक मताने  घेतले. आपले कुटुंब, आपली जबाबदारी हे सरकारचे धोरण लक्षात घेता आणि कोरोना आजारावर मात करण्याकरिता कुठलेही अन्य पर्याय नसून सर्व नागरिकांनी जनता कर्फ्यु यशस्वी पाडण्याकरिता सहकार्य करावे, असे विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री, अकोला तर्फे करण्यात आले आहे.




*जनता कर्फ्यु दरम्यान वैद्यकीय सेवा, औषध विक्री आणि दुग्ध पुरवठा वगळता सर्व प्रकारचे व्यापार आणि उद्योग प्रतिष्ठान पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील असे सर्व संमत निर्णय घेण्यात आले असून, सर्वांनी याचे पालन करावे. या कालावधीत किराणा आणि भाजीपाला विक्री पण बंद राहतील.



*अकोल्यातील सर्व संगठनांनी एक मताने हा निर्णय घेऊन याला आपला पाठिबा दिला, आणि जन प्रतिनिधीनी आपले आशिर्वाद आणि प्रशासनाने आपले सहकार्याचे आश्वासन दिले म्हणून चेंबरचे अध्यक्ष नितीन खंडेलवाल, उपाध्यक्ष  निकेश गुप्ता आणि आशिष चंदराणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहे.



प्रशासनाचा याबाबत कुठलाही आदेश नाही


जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, महापालिका प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनी जरी या जनता कर्फ्यु ला पूर्ण समर्थन व संमती दिले असले तरी,याबाबत जिल्हा प्रशासनाने अद्याप कुठलेच आदेश काढलेले नाही. चेंबरच्या प्रसिद्धी पत्रकात जिल्हा प्रशासनाचे सहकार्य व पूर्ण समर्थन आणि संमती असल्याचा उल्लेख आल्याने सामान्य जनता कर्फ्यु संदर्भात कन्फ्युज झाली आहे.


पालकमंत्री यांना सुध्दा परवानगी नव्हती

अकोल्यात कोरोनाचा उद्रेक होण्याचे संकेत दिसत असताना पालकमंत्री बच्चू कडू आणि सर्वपक्षीय आमदार यांनी एकमताने जनता संचारबंदीचा निर्णय घेतला होता.मात्र, शासनाने यासाठी परवानगी दिली नव्हती. मग आता चेंबरने घोषित केलेल्या जनता संचारबंदीला प्रशासनाने कसे सहकार्य दिले,असा प्रश्न स् अकोलेकरांना पडला आहे.


आधीच संचारबंदीला कंटाळले

कोरोनाच्या या संकट काळात अनेकांचा रोजगार हातून गेला आहे. सहा-सात महिन्यापासून आर्थिक संकटाशी सामान्य लोक,व्यापारी,विक्रेते दोन हात करीत आहे.आता परत पाच दिवस सर्व व्यवहार थांबल्याने अनेकांचे नुकसान होईल.त्यामुळे या जनता संचारबंदीला कितीसा प्रतिसाद मिळतो, हे संचारबंदी कालावधीत स्पष्ट होईलच. 


सक्ती नाही

या जनता संचारबंदीत कोणत्याही प्रकारची सक्ती केलेली नाही.नागरीकानी आणि व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने यामध्ये सहभागी व्हायचे आहे.तसेच कोणतीच संघटना दुकाने बंद करण्यासाठी दुकानदार, फेरीवाले आदींवर सक्ती करू शकणार नाही.जर जिल्हा प्रशासनाने साचारबंदीचे आदेश काढले तरच, घालून दिलेल्या नियम व अटीचे पालन अकोलेकर जनता, किरकोळ व ठोक विक्रेता, व्यापारी, उद्योजक,फेरीवाले दुकानदार आदींना  करावे लागणार आहे.






टिप्पण्या