Corona virus update:अकोल्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या पाच हजाराकडे वाटचाल!

अकोल्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या पाच हजाराकडे वाटचाल!

418 अहवाल प्राप्त; 111 पॉझिटीव्ह, 98 डिस्चार्ज, चार मयत


अकोला,दि.9:आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 418 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 307  अहवाल निगेटीव्ह तर 111 अहवाल पॉझिटीव्ह आले.

त्याच प्रमाणे काल (दि. 8) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 26  तर खाजगी लॅब मध्ये 18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आलात्यामुळे  आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 4964 (3982+835+147 झाली आहे. आज दिवसभरात 98 रुग्ण बरे झालेअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसारआजपर्यंत एकूण 31458 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 30625फेरतपासणीचे 188 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 645 नमुने होते. आजपर्यंत एकूण 31100 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27118  तर पॉझिटीव्ह अहवाल  4964 (3982+835+147) आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आज 111 पॉझिटिव्ह

दरम्यान आज दिवसभरात 111 जणांचे अहवा  पॉझिटीव्ह आले. त्यात आज सकाळी ८८ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात ३२ महिला व ५६ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ जणजीएमसी येथील सात जणकटयारखदान व तांदळी बु. ता. पातूर येथील चार जणलहान उमरीसिंधे कॅम्पमोठी उमरीगौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन जण,  मलकापूरजठारपेठपोलिस स्टेशन चन्नीकौलखेडरजपूतपुरा ता. बाळापूररेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन जणतर उर्वरित पिंपरगाव छाब्रे ता. बार्शिटाकळीपरसोबढेखेडागिता नगरसंत नगररणपिसे नगरकुबेर नगरगीता नगररेल्वे पोलिसमालीपूरावाखना वाघपिंपरी ता.अकोटखेतान नगरदिगरस ता. पातूरअकोट फैलखापरवाडावाडेगाव ता.बाळापूरजूनेशहरकेशवनगरमलकापूरनिमवाडीतापडीयानगरपिंजरतेल्हाराशास्रीनगरमुर्तिजापूर व बेलूरा (खु.)  येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच आज सायंकाळी २३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात आठ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे.  त्यातील आळशी प्लॉट येथील चार जणगोरक्षण रोड येथील तीन जणगाडेगाव ता. तेल्हारारामदास पेठकौलखेडमोठी उमरीआदर्श कॉलनी व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन जण

उर्वरित महसूल कॉलनीजठारपेठमलकापूर व अकोट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

काल रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 26 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅबनागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून आज  18 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, कृपया नोंद घ्यावी.

चार मयत

दरम्यान आज चार जणांचे मृत्यू झाले. त्यात अकोट फैलअकोला येथील ६६ वर्षीय पुरुष असून तो दि. ६ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झालागणेश नगर डाबकी रोडअकोला येथील ८४ वर्षीय पुरुष असून तो दि. ३ सप्टेंबर  रोजी दाखल झाला होता.त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला, बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष असून तो दि. ३१ ऑगस्ट  रोजी दाखल झाला.  त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण रजनापूरता. मुर्तिजापूर येथील ६० वर्षीय पुरुष असून तो दि. ५ सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला.

98 जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दिवसभरात  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६४ जणकोविड केअर सेंटरअकोला येथून २८ जणहॉटेल रिजेन्सी  येथून पाच जणतर कोविड केअर सेंटरबार्शीटाकळी येथून एक जणांना असे एकूण ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आलाअशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.

1066 रुग्णांवर उपचार सुरु

आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 4964 (3982+835+147) आहे. त्यातील 172 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची  3726 संख्या  आहे. तर सद्यस्थितीत 1066 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेतअशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.


रॅपिड ॲन्टीजन टेस्ट: आज दिवसभरात 334 चाचण्या, 81 पॉझिटिव्ह


कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत हे. यात आज दिवसभरात झालेल्या 334 चाचण्या झाल्या त्यात 81 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाअशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.


आज दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे-  अकोला ग्रामिण येथे 133 चाचण्या झाल्या त्यात 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अकोट येथे 30 चाचण्या झाल्या त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला,  बाळापूर येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही  अहवाल पॉझिटिव्ह आला नाही,  बार्शीटाकळी येथे  चार चाचण्या झाल्या त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, पातूर व तेल्हारा येथे चाचण्या झाले नाही.  


मुर्तिजापूर येथे 98 चाचण्या झाल्या त्यात 39 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.  तसेच अकोला मनपा येथे चाचण्या झाल्या नाही, अकोला आयएमए येथे 12 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 



शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चाचण्या झाल्या नाही, 52 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आलाअसे दिवसभरात 334 चाचण्यांमध्ये 81 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14406 चाचण्या झाल्या त्यात 924 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेतअसे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.



टिप्पण्या