- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
अकोल्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या; विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
अकोला: जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत शुक्रवारी सायंकाळी विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आढावा घेतला. कोरोना रुग्णांची वाढती संख्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभीये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. फारुखी, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, निवासी उप जिल्हाधिकारी संजय खडसे, उप विभागीय अधिकारी गजानन सुरंजे, उप विभागीय अधिकारी निलेश अपार, वैद्यकीय अधिकारी सिरसाम आदी उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त यांनी जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढ, मृत्यू संख्या वाढ या संदर्भात आढावा घेतला. ऑक्सीजन व व्हेंटीलेटर यांच्या उपलब्धेतेबाबत आढावा घेवून आवश्यकतेनुसार ऑक्सीजन व व्हेटीलेटरची पुरविण्याबाबत सूचनाही दिल्यात. तसेच वाढत्या कोरोना रुग्णाची संख्या पाहता पर्यायी व्यवस्था करावी. जिल्हा स्त्री रुग्णालय येथील नवीन इमारतीमध्ये कोविड रुग्णांना उपचाराकरीता आवश्यक सुुविधा उपलब्ध करावे. जिल्ह्यात वाढत असलेल्या रुग्ण संख़्येबाबत त्यांनी चिंता व्यक्त करुन कोरोना रुग्णाचा शोध घेवून त्याला थोपविण्यासाठी रुग्णांच्या संपर्कातील शोध घ्यावा. यासाठी रॅपिड टेस्टचे प्रमाण वाढविण्याचे सूचना त्यांनी दिल्यात.
जिल्हयामध्ये चालू असलेल्या सिरॉलॉजिकल सर्वेक्षणाबाबत आढावा घेवून ग्रामीण भागामध्ये सिरॉलॉजिकल सर्वे करण्याचे सूचना त्यानी दिल्यात. अतिधोक्याच्या रुग्णाना प्लॉझमा थेरपी देवून मृत्यू दर कमी करण्याचे सूचना वैद्यकीय अधिकारी यांना दिल्यात.
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5282
शुक्रवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे 411 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 266 अहवाल निगेटीव्ह तर 145 अहवाल पॉझिटीव्ह आले.
त्याच प्रमाणे (दि. 10) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये 17 तर खाजगी लॅब मध्ये आज कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता अकोला जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 5282 (4202+933+147) झाली आहे. दिवसभरात 159 रुग्ण बरे झाले, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 32307 जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे 31448, फेरतपासणीचे 189 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 670 नमुने होते. आजपर्यंत एकूण 31917 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 27715 तर पॉझिटीव्ह अहवाल 5282 (4202+933+147) आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आज 145 पॉझिटिव्ह
शुक्रवारी दिवसभरात 145 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात सकाळी 81 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. त्यात 28 महिला व 53 पुरुषांचा समावेश आहे. त्यातील पिंजर येथील सात जण, दापूरा व मोठी उमरी येथील प्रत्येकी सहा जण, नागे लेआऊट येथील पाच जण, श्रावंगी प्लॉट, बार्शिटाकळी व रेवदा ता. बार्शिटाकळी येथील प्रत्येकी चार जण, कौलखेड, मलकापूर, गणेश नगर व रिंग रोड येथील तीन जण, खडकी, जवाहर नगर व पिंपळगाव चंभारे येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित आदर्श कॉलनी, आळंदा ता. बार्शिटाकळी, आगर, शिवनी, मुर्तिजापूर, खिक्रीयन कॉलनी, अन्वी मिर्जापूर, लहान उमरी, मरोडा ता. अकोट, सिंदखेड ता. बार्शिटाकळी, जीएमसी, डाबकी रोड, जूने शहर, तुंलगा ब्रू. ता. पातूर, सुधीर कॉलनी, वृंदावन कॉलनी, बेलखेड ता. तेल्हारा, गौरक्षण रोड, जठारपेठ, गोरेगाव, दत्त कॉलनी, देवी खदान, यागाचौक, पारस, चान्वी, आरटीओ रोड व जामवसू ता. बार्शिटाकळी प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच सायंकाळी 64 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात 32 महिला व 32 पुरुष आहे. त्यातील दहिगाव येथील नऊ जण,डाबकी रोड व गौरक्षण रोड येथील प्रत्येकी सहा जण, कौलखेड, लहान उमरी व जूने शहर येथील चार जण, उमरी व रणपिसे नगर येथील प्रत्येकी तीन जण, देशमुख फैल, सिसा ता. बार्शिटाकळी, खेमका सदन, गितानगर, वाडेगाव, मोठी उमरी व राऊतवाडी येथील प्रत्येकी दोन जण, तर उर्वरित तोष्णीवाल लेआऊट, बालाजीनगर, महान, कळंबा, जीएमसी, दुर्गाचौक, वडाळी देशमुख, जूना कपडा बाजार, माधव नगर, आळसी प्लॉट व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
गुरुवारी रात्री रॅपिड ॲटीजेन टेस्टमध्ये 17 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. तसेच ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून शुक्रवारी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
दोन मयत
दरम्या दोघांचा मृत्यू झाला. त्यात चिखलगाव ता. पातूर येथील 75 वर्षीय पुरुष असून तो दि. 8 सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचार घेताना मृत्यू झाला. तर पोळा चौक, जूने शहर, अकोला येथील 70 वर्षीय महिला असून ती दि. 7 सप्टेंबर रोजी दाखल झाली होती. तिचा उपचार घेताना मृत्यू झाला.
159 जणांना डिस्चार्ज
दरम्यान दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 48 जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून 35 जणांना,उपजिल्हा रुग्णालयातून 10 जणाना, आयकॉन हॉस्पीटल व ओझोन हॉस्पीटल येथून प्रत्येकी एक, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून 47 जणांना तर कोविड केअर सेंटर, बार्शिटाकळी येथून 17 जणांना अशा एकूण 159 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातून देण्यात आली आहे.
1090 रुग्णांवर उपचार सुरु
आजपर्यंत एकूण पॉझिटीव्ह अहवालांची संख्या 5282 (4202+933+147) आहे. त्यातील 175 जण मयत आहेत. डिस्चार्ज दिलेल्या एकूण व्यक्तींची 4017 संख्या आहे. तर सद्यस्थितीत 1090 पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली आहे.
रॅपिड ॲन्टीजन टेस्ट
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात आज दिवसभरात झालेल्या 77 चाचण्या झाल्या त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.
दिवसभरात झालेल्या चाचण्या याप्रमाणे- अकोला ग्रामिण, पातूर, तेल्हारा व मुर्तिजापूर येथे चाचण्या झाल्या नाही. अकोट येथे 36 चाचण्या झाल्या त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, बाळापूर येथे सात चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, बार्शीटाकळी येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. तसेच अकोला मनपा व अकोला आयएमए येथे चाचण्या झाल्या नाही, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे चार चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही, 25 वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे दिवसभरात 77 चाचण्यांमध्ये सात जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. तर आजपर्यंत 14624 चाचण्या झाल्या त्यात 948 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा