corona virus news: बुलडाणा जिल्हा परिषद सदस्याचा कोरोनाने मृत्यू; तर शिवसेना तालुका प्रमुख कोरोनाग्रस्त

बुलढाणा जिल्हा परिषद सदस्याचा कोरोनाने मृत्यू; तर शिवसेना तालुका प्रमुख कोरोनाग्रस्त


संजय गायकवाड यांचे सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह; गायकवाड यांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह!





बुलढाणा: नांदुरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद सर्कलचे सदस्य मधुकरराव वडोदे यांचा मृत्यू झाला असून, कालच त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता.


भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निमगाव सर्कलमधून विजयी होऊन बुलडाणा जिल्हा परिषदमध्ये आलेले मधुकर वडोदे हे अभ्यासू व्यक्तिमत्व होते, त्यांना ताप आल्यामुळे आधी खामगाव येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते, मात्र त्यांना निमोनिया निघाल्याने पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठविण्यात आले. तेथे काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता, तो पॉझिटिव्ह आला होता. त्यांना हृदयाचाही त्रास होता व दम्याचाही त्रास होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.


दरम्यान, त्यांचा आज गुरुवार ३ सप्टेंबर रोजी सकाळी ७. ३० वाजता त्यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या पार्थिवावर अकोला येथेच महानगरपालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आला असल्याची माहिती आहे.


"आपल्या सर्कलच्या समस्या व विविध प्रश्न जिल्हा परिषद सभागृहात विवेकी पद्धतीने मांडणारे मधुकरराव वडोदे यांच्या निधनाची बातमी अचानक ऐकून धक्काच बसला. त्यांच्या जाण्याने जिल्हा परिषद वर्तुळात दुःखाचे वातावरण असून एका विवेकी सदस्याला जिल्हा परिषद मुकली." 

मनीषा पवार 
जि. प. अध्यक्षा   



संजय गायकवाड यांचे सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह; गायकवाड यांचा रिपोर्ट मात्र निगेटिव्ह

बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील व  निकटतम संपर्कातील 19 जणांची चाचणी आज करण्यात आली असता, त्यांच्या दोन्ही बॉडिगार्डचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र आ. संजय गायकवाड यांच्यासह अन्य १७ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.




शिवसेना तालुका प्रमुख कोरोनाग्रस्त

शिवसेना बुलडाणा तालुकाप्रमुख
लखन गाडेकर कोरोना पॉझिटिव्ह निघाले.याआधी बुलडाण्याचे आजी-माजी जिल्हाप्रमुखही  कोरोना पॉझिटिव्ह आले होते,अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली.

टिप्पण्या