*कोरोना अलर्ट*:आजपर्यंतचा रेकॉर्ड मोडला...आज दिवसभरात 127 कोरोना पॉझिटिव्ह!
*आज शनिवार दि. ५ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*
*प्राप्त अहवाल- ४१८*
*पॉझिटीव्ह- १२७*
*निगेटीव्ह-२९१*
*अतिरिक्त माहिती*
आज सायंकाळी 46 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात १२ महिला व ३४ पुरुष आहेत. त्यात हातरुण व सेंट्रल जेल येथील प्रत्येकी आठ जण, जीएमसी, न्यु राधाकीसन प्लॉट, जूने शहर येथील प्रत्येकी तीन जण, कौलखेड, सस्ती, पातूर, गोरेगाव खु. येथील प्रत्येकी दोन तर उर्वरित गौरक्षण रोड, बलोदे लेआऊट, दहातोंडा, सहकार नगर, शिवनी, मुर्तिजापूर, अकोट, संताजी नगर, दिनोडा, संकेत विहार, बाळापूर, जठारपेठ व कटयार येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान अकोला येथील डॉ. हेडगेवार हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर यांच्यामार्फत ध्रुव पॅथॉलॉजी लॅब, नागपूर या खाजगी प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालांत १६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यांचा आजच्या अहवालात करण्यात आला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.
दरम्यान आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २० जण, कोविड केअर सेंटर, अकोला येथून १३ जण, मुर्तिजापूर उप जिल्हा रुग्णालयातून सात जण, आयकॉन हॉस्पिटल येथून दोन जण, हॉटेल रिजेन्सी येथून तीन जण तर हॉटेल रणजित येथून एक जणांना असे एकूण ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ३६१४+७८७+११०=४५११*
*मयत-१६५*
*डिस्चार्ज- ३४२०*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)-९२६*
(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)
*घरीच रहा, सुरक्षित रहा!*
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा