Corona update:*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात९० पॉझिटिव्ह;१ मयत

*कोरोना अलर्ट*:अकोला:आज दिवसभरात
९० पॉझिटिव्ह;१ मयत



*आज गुरुवार  दि. २४ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी (सकाळ+सायंकाळ) प्राप्त अहवालानुसार,*

*प्राप्त अहवाल-४२६*
*पॉझिटीव्ह-९०*
*निगेटीव्ह- ३३६*


*अतिरिक्त माहिती*

आज सायंकाळी  ८७ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात ३३ महिला व ५४ पुरुष  आहे. त्यातील मुर्तिजापूर येथील ११ जण, कुटासा व जीएमसी येथील प्रत्येकी नऊ जण, लर्डी हॉर्डींग जवळ येथील चार जण, कौलखेड, खदान, जठारपेठ, अकोट व लहान उमरी येथील प्रत्येकी तीन जण, अकोट फैल, मंडूरा, शात्री नगर, वानखडे नगर, गौरक्षण रोड, मोठी उमरी, रेणूका नगर, सिंधी कॅम्प व सिरसो येथील प्रत्येकी दोन जण.



 उर्वरित बार्शीटाकळी, महसूल कॉलनी, बायपास, लक्ष्मी नगर, चांदूर, डाबकी रोड, देवरावबाबा चाळ, बाळापूर, कान्हेरी गवळी, बोरगाव मंजू, कच्ची खोली, ‍शिवनी, खिरपूर, हिंगणा रोड, अंबिकी नगर, खडकी, बळीराम चौक, किनखेड, मोरगाव भाकरे, खोलेश्वर व दहिंहाडा येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवासी आहे. 



दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण अकोट येथील ७९ वर्षीय पुरुष असून ते २० सप्टेंबर रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.



दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथून ४० जणांना, कोविड केअर सेंटर, अकोला येथून नऊ जण डिस्चार्ज देण्यात आला. उपजिल्हा रुग्णालय, मुर्तिजापूर येथील आठ जण, हॉटेल रिजेन्सी येथील चार जण, ओझोन हॉस्पीटल येथील सात जण, युनिक हॉस्पीटल येथील दोन जण, आयकॉन हॉस्पीटल येथील दोन जण, आर्युवेदीक महाविद्यालय येथून दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले. तसेच होमक्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाला अशा १२५ जणांना  अशा एकूण १९९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 



*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटीव्ह अहवाल- ५७०१+१०६८+१५५=६९२४*
*मयत-२१७*
*डिस्चार्ज- ५१४४*
*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- १५६३*

(शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार)

*घरीच रहा, सुरक्षित रहा!*

टिप्पण्या